रणवीर सिंग आणि वरुण धवन हे आताच्या घडीला आघाडीच्या कलाकारांमध्ये गणले जातात. दोघेही जण वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. त्या दोघांच्या अभिनयाचे करोडो चाहते आहेत. कामाच्या बाबतीत रणवीर सिंग वरुण धवनला सीनियर आहे. त्यामुळे या नात्याने रणवीर सिंग हे वरुणला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

रणवीर आणि वरुण या दोघांच्याही कामाची एक वेगळीच शैली आहे. रणवीर सिंग हा नवनवीन विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये काम करताना दिसतो. तर दुसरीकडे वरुण धवन याचे अनेक चित्रपट हे कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे रिमेक असतात. वरुण धवनने गोविंदाच्या ‘जुडवा’ आणि ‘कुली नंबर 1’ या चित्रपटांच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका सकारल्या आहेत. हे दोन्ही चित्रपट काही खास कामगिरी करू शकले नाहीत. पण आता रिमेक करण्याबाबत रणवीरने वरुण याला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
veer pahariya varun dhawan body double bhediya
वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

हेही वाचा : “शरीरसंबंध ठेवले तरच…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; आयुष्मान, रणवीरच्या नावाचाही उल्लेख

वरुणने आत्तापर्यंत ज्या चित्रपटांचे रिमेक केले ते गोविंदाचे चित्रपट होते. रणवीर गोविंदाचा खूप मोठा चाहता आहे. त्याचे चित्रपट बघून तो लहानाचा मोठा झाला आहे. मध्यंतरी कार्यक्रमात जेव्हा तो गोविंदाला भेटला तेव्हा त्याने त्याच्यासमोर अक्षरशः लोटांगण घातलं. त्यामुळे त्याने वरुणला सल्ला दिला की, “तू काहीही कर पण गोविंदा यांच्या ‘राजा बाबू’ या चित्रपटाचा रिमेक करू नकोस.” रणवीरच्या मते ‘राजा बाबू’ हा चित्रपटच इतका उत्कृष्ट आहे की त्याचा रिमेक होऊच शकत नाही. आता रणवीरने दिलेला हा सल्ला वरून ऐकतोय की नाही हे पुढील काही दिवसात कळेल.

Story img Loader