करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या टीझरनंतर अलीकडेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील पहिले गाणे “तुम क्या मिले…” प्रदर्शित करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या “तुम क्या मिले…” गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सध्या हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आलियाने अलीकडेच या गाण्यावरील रिल व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या रिलमध्ये अभिनेत्री समुद्रकिनारी आनंद घेताना पाहायला मिळत आहे. मात्र, रणवीर सिंहने याउलट रोमॅंटिक गाण्यावर मजेशीर रिल बनवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रणवीर सिंहने प्रत्यक्ष समुद्रकिनारी किंवा कोणत्याही सुंदर जागी न जाता स्टुडिओमध्ये ग्रीन स्क्रीनचा वापर करत रोमॅंटिक गाण्यावर मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला रणवीरने “आलिया एवढं बजेट माझ्याकडे नव्हतं” असे कॅप्शन दिले आहे. अर्थात आलियासारखे समुद्रकिनारी जाऊन शूटिंग करण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत असे या कॅप्शनमधून रणवीर सिंहला सूचित करायचे आहे.
हेही वाचा : सारा अली खानने आई अमृता सिंहबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, “माझा चित्रपट…”
रणवीरच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “माझ्याकडे ६ रुपये होते ते तुला दिले असते…” तसेच दुसऱ्या एका युजरने “आदिपुरुषच्या व्हीएफएक्स टीमने रणवीरचा व्हिडीओ बनवलाय” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अभिनेत्री आलिया भट्टने यावर ‘लीजेंड’ अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.