सध्या शाहरुख खान आणि त्याची टीम ‘जवान’चं यश साजरं करत आहे. १५ सप्टेंबर रोजी ‘जवान’च्या टीमने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, चित्रपटाच्या शुटिंगवेळचे किस्सेही सांगितले. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटात कॅमिओ केला आहे. तिनेही या इव्हेंटला हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला चित्रपट हिट करण्यासाठी ईदला प्रदर्शित…”, शाहरुखने सलमान खानला लगावला टोला? किंग खानचा हा व्हिडीओ पाहाच!

या इव्हेंटमध्ये मंचावर दीपिकाने शाहरुख खानला गालावर किस केलं. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच दीपिकाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी एक फोटो तिने शाहरुखबरोबरचा टाकला आहे, ज्यामध्ये ती शाहरुखच्या गालावर किस करत आहे. तसेच हा तिचा आवडता फोटो असल्याचंही तिने म्हटलं आहे.

दीपिकाने ही पोस्ट केल्यानंतर त्यावर तिचा पती रणवीर सिंहने केलेल्या कमेंटने लक्ष वेधलं आहे. ‘इश्क मे दिल बना है, इश्क मे दिल फना है’, अशी कमेंट दीपिकाच्या फोटोवर रणवीरने केली आहे.

रणवीर सिंहची कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होऊन आठ दिवस झाले आहेत. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. अवघ्या आठ दिवसातच चित्रपटाने भारतात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा ७०० कोटींहून जास्त झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh reaction on deepika padukone kissing shah rukh khan photo jawan success hrc