काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरने ‘डॉन 3’ची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर सिंग ‘डॉन’ची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं होतं. परंतु ही गोष्ट मात्र चाहत्यांना अजिबातच पटलेली नाही. लोकांनी त्याची तुलना शाहरुख खानशी केली. लोकांनी रणवीरसह फरहानवरही जोरदार टीका केली. रणवीरला ‘डॉन’च्या भूमिकेत कास्ट करणं हा चुकीचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे. आता रणवीर सिंगने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.

करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये नुकतीच दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंगने हजेरी लावली.पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर-दीपिका आले होते. येथे त्याने त्याचे लग्न, नातेसंबंध आणि कामाबद्दल बोलले. दीपिकाने तिच्या नैराश्याबाबतही चर्चा केली. याचदरम्यान रणवीरने ‘डॉन ३’बद्दल भाष्य केलं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : खिलाडी कुमार बनणार ‘Psycho’; अक्षयच्या आगामी चित्रपटाची चर्चा, अभिनेता दिसणार वेगळ्याच रूपात

करण जोहरने ‘डॉन ३’मुळे होणारी टीका आणि त्यावरून होणाऱ्या तुलनेबद्दल प्रश्न विचारल्यावर रणवीरने उत्तर दिलं. तो म्हणाला, “मला एक संधी देऊन बघा, गेल्या १२ ते १३ वर्षांपासून ठीक-ठाक काम करतोय. त्यामुळे ही एक संधी मला मिळायला हवी असं मला वाटतं.” काही लोकांनी यावरून रणवीरला ट्रोल केलं तर काहींनी खरंच त्याला एक संधी मिळायला हवी असे मत मांडले.

मीडिया रीपोर्टनुसार ‘डॉन ३’चं चित्रीकरण २०२४ मध्ये सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान पाठोपाठ रणवीर सिंग या चित्रपटाशी जोडला गेला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत, पण शाहरुखचे चाहते मात्र यामुळे फार नाराज झाले असल्याचंही दिसत आहे. रणवीर या पात्राला योग्य न्याय देऊ शकतो की नाही ते आता चित्रपट समोर आल्यावरच सांगता येईल.

Story img Loader