‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत ७० कोटींचा गल्ला जमावला आहे. दिग्दर्शक करण जोहरसह चित्रपटातील सर्व भूमिकांचे सध्या कौतुक करण्यात येत आहे. रणवीर सिंहने साकारलेल्या चित्रपटातील रॉकी रंधावाच्या भूमिकेने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट पाहिल्यावर दीपिकाची काय प्रतिक्रिया होती याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “माझी बायको, माझं वेड!”, जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “तू माझी…”

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

रणवीर सिंह बायको दीपिका पदुकोणसह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ पाहण्यासाठी गेला होता. दीपिकाला हा चित्रपट आवडला का? यावर उत्तर देत रणवीर म्हणाला, “रॉकी और रानी हा माझ्या आयुष्यात मला कायम लक्षात राहिल असा चित्रपट आहे. रिलीज झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी दीपिकाला चित्रपट पाहायला घेऊन गेलो होतो. प्रीमियरला मी आधीच सिनेमा पाहिला असल्याने मी पूर्णवेळ दीपिकाच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे आहेत ते पाहत होतो.”

हेही वाचा : “सोशल मीडियावर १०० लोकांचे…”, लेकीला ट्रोल करणाऱ्यांवर काजोल संतापली; म्हणाली, “निर्दयीपणे…”

रणवीर पुढे म्हणाला, “शेवटच्या रांगेत बसून आम्ही चित्रपट पाहत होतो. दीपिका ‘रॉकी और रानी’ पाहताना मध्येच हसत होती, मधले काही सीन्स पाहून रडली, तिने माझ्यासाठी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या…आणि बहुतांशवेळा ती माझ्याकडे पाहून Wow म्हणत आश्चर्य व्यक्त करत होती. तिच्याबरोबर बसून चित्रपट पाहता आला हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव होता. तिला माझा सिनेमा आवडला म्हणून मी अत्यंत आनंदी असून मला स्वत:चा अभिमान वाटतोय…”

हेही वाचा : ‘तारक मेहतां’नी जिंकला असित मोदीविरोधातील खटला; शैलेश लोढांना मिळेल कोट्यवधींची थकबाकी, म्हणाले, “ही लढाई…”

दरम्यान, करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोघांसह जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र, क्षिती जोग या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader