‘गोलियों की रासलीला: रामलीला’ चित्रपटात दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपट सुपरहिट ठरला आणि ही पडद्यावरील जोडी खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडली. पण तुम्हाला माहितीये का, ही या चित्रपटात लीलाची भूमिका साकारण्यासाठी दीपिका पहिली पसंती नव्हती. होय. रणवीरने ‘कॉफी विथ करण’च्या ८ पर्वात याबाबत खुलासा केला आहे.

“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

रणवीरने सांगितलं की चित्रपटाचा सेट तयार झाला होता. सर्वजण शुटिंग सुरू करण्याची तयारी करत होते. पण १० दिवसांपूर्वी करीनाने चित्रपट सोडला. त्यानंतर संजय लीला भंसाळी करीनाची रिप्लेसमेंट शोधत होते. तेव्हाच दीपिकाचा एक चित्रपट आला होता आणि त्यांनी दीपिकाला लीलाच्या भूमिकेसाठी घेण्याचा निर्णय घेतला.

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

दरम्यान, करीनाने स्वतःही हा चित्रपट का सोडला याबाबत एकदा सांगितलं होतं. “मी मान्य करते की मी वेडी आहे. अनेक वेळा मी चित्रपट साइन करते आणि नंतर मला वाटलं की ते चुकीचे आहे. होय, मी राम-लीला करणार होते पण मी माझा विचार बदलला. मी ‘गोरी तेरे प्यार मे’ हा चित्रपट करायचं ठरवलं. खरं तर सगळं माझ्या मूडवर असतं. पण मला चित्रपट सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही,” असं करीना म्हणाली होती.

भन्साळींनी एका मुलाखतीत करीनाने चित्रपट सोडल्याचा उल्लेख केला होता. “सेट तयार होता, शूटिंगच्या १० दिवस आधी तिने सिनेमा सोडणं खूप धक्कादायक होतं,” असं ते म्हणाले होते.

Story img Loader