Singham Again Trailer Launch : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना सप्टेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्त झालं असून, त्यांची लाडकी मुलगी आता एक महिन्याची झाली आहे. आता हे जोडपं त्यांचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि रवि किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रणवीर सिंगने आपल्या नवजात मुलीबद्दल काही गोड गोष्टी शेअर केल्या आणि चाहत्यांना आश्चर्यचकित करत सांगितलं की, त्यांच्या मुलीचंही चित्रपटात पदार्पण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांशी बोलताना रणवीर सिंह (Ranveer Singh) म्हणाला, “दीपिका बाळाची देखभाल करण्यात व्यस्त आहे, त्यामुळे फक्त मीच इथे येऊ शकलो.” त्यानं पुढे सांगितलं, “माझी बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी रात्रीची असते.” हे ऐकून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला आणि जोरदार शिट्ट्या वाजवल्या.

हेही वाचा…Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?

बेबी सिम्बाही करणार चित्रपटात पदार्पण

रणवीरने पुढे आणखी एक मोठी बातमी दिली. “चित्रपटात ज्या कलाकारांना तुम्ही पाहणार आहात, त्यांच्याबरोबर आमचं बाळ ‘बेबी सिम्बा’सुद्धा पदार्पण करत आहे, कारण दीपिका चित्रपटाचं शूटिंग करत असताना गरोदर होती.” रणवीरने त्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या वतीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, “लेडी सिंघम आणि बाळ सिम्बाच्या वतीने तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कृपया यंदाची दिवाळी आपल्या कुटुंबाबरोबर चित्रपटगृहात हा चित्रपट पाहून साजरी करा.”

चित्रपट निर्मात्यांनी यावेळी ‘सिंघम अगेन’चा पहिला ट्रेलरही प्रदर्शित केला, ज्यात अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि ‘सीआयडी’फेम दयानंद शेट्टी दिसत आहेत. हा चित्रपट एक मसालापट असून कौटुंबिक मनोरंजन करणारा ठरणार असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतंय. रणवीर सिंहने या कार्यक्रमात सांगितलं की, अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ उपस्थित राहू शकले नाहीत, कारण ते सध्या ‘हाउसफुल ५’चं शूटिंग करत आहेत.

हेही वाचा…अरबाज खानला चाहत्याने विचारला तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न, अभिनेता उत्तर देत म्हणाला…

‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा डीसीपी बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच करीना कपूरचंही या फ्रँचायझीमध्ये पुनरागमन होत आहे. सलमान खानदेखील चित्रपटात ‘चुलबुल पांडे’च्या भूमिकेत कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. जवळपास ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh said his daughter baby simba debut in singham again with deepika padukone psg