बॉलीवूडचं लोकप्रिय कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. या कपलने फेब्रुवारी महिन्यात दीपिकाच्या प्रेग्नेन्सीची चाहत्यांना गुड न्यूज दिली. प्रेग्नेन्सीदरम्यान दीपिका अनेकदा वेगवेगळ्या इव्हेंट्सला हजर राहताना दिसली. यादरम्यान दीपिकाने सिंघम अगेनचं शूटिंगदेखील केलं होतं, तर रणवीरदेखील त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेग्नेन्सीदरम्यान अनेकदा हे कपल वेकेशन एन्जॉय करण्यासाठी जाताना विमानतळावर दिसले आहेत. दोघंही त्यांचा हा क्वॉलिटी टाईम अगदी आनंदात घालवताना दिसतायत. अशातच आता रणवीरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दीपिकाचे बेबी बंपमधले फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा… “ए काळी आली काळी आली…”, जुई गडकरीला लोक रंगावरून हिणवायचे, अभिनेत्री वाईट अनुभव सांगत म्हणाली, “मी खूप रडायचे…”

अलीकडेच दीपिकाने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली होती. यासाठी दीपिकाने खास काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. तसंच मॅचिंग हिल्स आणि गोल्डन- सिल्वर रंगाची ज्वेलरी, हेअर स्टाईलसाठी पोनीटेल असा संपूर्ण लूक केला होता. या लूकमध्ये दीपिकाच्या बेबी बंपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम प्रियांका तेंडोलकरला आवडतो ‘हा’ अभिनेता, म्हणाली, “तो पळून…”

आता याचेच फोटो एका व्हिडीओच्या स्वरूपात पती रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. “I had the biggest crush on deepika” हे गाणं रणवीरने या व्हिडीओला जोडलं आहे. रणवीरने बायकोसाठी खास शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

दीपिका आणि रणवीरची लव्हस्टोरी

दीपिका आणि रणवीरने सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. या कपलचा लग्नसोहळा इटलीमध्ये पार पडला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर फेब्रुवारीमध्ये दीपिकाच्या प्रग्नेन्सीची गुड न्यूज या कपलने चाहत्यांना दिली.

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अपर्णाने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका शेवटची ‘फायटर’मध्ये झळकली होती. आता अभिनेत्री ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटातदेखील दिसणार आहे. तसंच दीपिकाचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साउथ स्टार प्रभास आणि बिग बी अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर रणवीर सिंह ‘डॉन-३’ या चित्रपटात कियारा अडवाणीबरोबर झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh shared deepika padukone baby bump photos said biggest crush dvr