पदार्पणापासूनच अभिनेता रणवीर सिंगने प्रेक्षकांवर एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्याच्या पहिल्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात त्याने अनुष्का शर्मा बरोबर स्क्रीन शेअर केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या या कामगिरीबद्दल नुकतेच त्याला मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘इतोल आयडॉल’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर सिंग नुकताच मोरोक्को येथे गेला होता. तेथे त्याला मोरोपमधील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘इतोल आयडॉल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. या वेळचे अनेक फोटो रणवीर ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत. या पुरस्कार सोहळा दरम्यान त्याची एक मुलाखतही घेण्यात आली. त्या मुलाखतीत त्याने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला.

आणखी वाचा : Video: चाहती चक्कर येऊन कोसळल्याचे पाहताच वरुण धवनने पुढे केला मदतीचा हात, होतोय कौतुकाचा वर्षाव

आज रणवीरने जे स्थान मिळवले आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला भरपूर मेहनत करावी लागली आहे. या सोहळ्यात घेतल्या गेलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने त्या सगळ्या दिवसांबद्दल भाष्य केलं आहे. या दरम्यान त्याने अनुभवलेले अनेक चांगले-वाईट प्रसंग शेअर केले.

या मुलाखतीत रणवीरने त्याच्या बॉलीवूड मधील पदार्पणाच्या आधीची एक धक्कादायक आठवण सांगितली. रणवीर सिंगला का प्रसिद्ध निर्मात्याने चित्रपटाची बोलणी करण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी एका खाजगी पार्टीचही आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत गंमत म्हणून त्या निर्मात्याने रणवीर सिंगच्या मागे त्याचा कुत्रा सोडला होता, असा खुलासा रणवीर सिंग ने केला आहे.

हेही वाचा : Photos: फक्त सानिया मिर्झाच नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड कपल्सच्याही घटस्फोटांच्या रंगल्या होत्या चर्चा

त्याच्या या बोलण्यानंतर मुलाखत घेणाऱ्याने त्याला त्या निर्मात्याचं नावही विचारलं. मात्र रणवीरने त्याचं नाव सांगण्यास नकार दिला आणि तो निर्माता आज या जगात नाही, असं रणवीरने सांगितलं. रणवीरने सांगितलेली ही आठवण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतेय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh shared memories of his struggle days in an interview rnv