‘कल्की : २८९८ एडी’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगतात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. रणवीर सिंहने या चित्रपटात त्याच्या पत्नीची दीपिकाची भूमिका कशी वाटली याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपटात दीपिकाने साकारलेले पात्र गर्भवती आहे आणि खऱ्या आयुष्यातदेखील दीपिका गर्भवती आहे. हा खूप मोठा योगायोग असल्याचे म्हटले जात आहे . त्यावर बोलताना दीपिकाचा पती व अभिनेता रणवीर सिंहने हे माझ्यासाठी स्वप्नवत असल्याचे म्हटले आहे. दीपिकाचा असा चित्रपट पाहणे ज्यामध्ये तिचे पात्र गर्भवती आहे आणि खऱ्या आयुष्यातदेखील ती गर्भवती आहे, हे संपूर्ण माझ्यासाठी स्वप्नवत असल्याचे रणवीर सिंहने म्हटले आहे. दीपिका पदुकोनने या योगायोगाबद्दल सांगताना, माझ्या काय भावना असल्या पाहिजेत मला माहीत नाही; पण मी भारावून गेली असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
B Praak
“…त्यामुळे माझी पत्नी आजपर्यंत माझ्यावर नाराज”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Ruhi Chaturvedi announces pregnancy
Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी

‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत, शाश्वत चॅटर्जी यांनीदेखील या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यांनी दीपिकाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. दीपिका नेहमीच हसतमुख असते. चित्रपटात एक प्रसंग असा आहे की, मी दीपिकाचे केस ओढतो. हा शूटिंग शेवटचा भाग होता आणि दीपिका तोपर्यंत गर्भवती होती. त्यामुळे आम्ही हा सीन मुंबईत शूट केला होता. रणवीर सिंहविषयी त्यांनी म्हटले आहे की, या शूटदरम्यान रणवीरदेखील सेटवरती आला होता. त्या दिवशी त्याने केसरी रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याच्याकडे पाहून खूप सकारात्मक वाटले होते. तो एका ठिकाणी थांबू शकत नव्हता. त्या सीनमध्ये खूप हाणामारी होती. त्यामुळे मी रणवीरला सांगितले की, काळजी करू नकोस. ज्या ठिकाणी हाणामारी होणार आहे, त्यासाठी बॉडी डबल आहेत. तो खूप शांत आणि प्रेमळ आहे. मी त्याला असे म्हटल्यावर त्याने हसून मला, माहीत आहे दादा, असा प्रेमळ प्रतिसाद दिला.

‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाने आतापर्यंत संपूर्ण जगभरात जवळजवळ ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा आकडा पार करील, असा अंदाज केला जात आहे.