रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावत’ चित्रपट प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारा ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अगदी रेकॉर्डब्रेक कमाई केली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात त्याने साकारलेली अलाउद्दीन खिलजीची भूमिका तर सुपरहिट ठरली. या भूमिकेसाठी रणवीरने केलेली मेहनत रुपेरी पडद्यावर दिसून आली. याच चित्रपटादरम्यान घडलेला एक किस्सा चर्चेचा विषय ठरला होता.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रणवीरला २४ वेळा कानाखाली मारण्यात आली होती. ‘पद्मावत’मध्ये रजा मुराद यांच्याबरोबर रणवीरचा एक सीन होता. या सीनमध्ये रजा मुराद त्याला कानाखाली मारतात. हा सीन चित्रित झाला. पण संजय लीला भन्साळी यांना हा सीन पटला नाही. हा सीन पुन्हा चित्रीत करण्याचा निर्णय संजय भन्साळींनी घेतला.
रजा मुराद यांनी या सीनसाठी तब्बल २४वेळा रणवीरच्या कानाखाली मारली. २४वा रिटेक भन्साळींना परफेक्ट वाटला. त्यानंतरच हा सीन चित्रित झाला. सीन अगदी खरा वाटावा म्हणून रणवीरला २४वेळा कानाखाली सहन करावी लागली. मात्र या चित्रपटासाठी रणवीरने घेतलेली मेहनत अगदी कौतुकास्पद ठरली.
‘पद्मावत’मध्ये रणवीरबरोबरच शाहिद कपूर, दीपिका पदुकोण, आदिती राव हैदरी यांसारख्या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या. बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘पद्मावत’चाही समावेश आहे. सध्या रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट २८ जुलैला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.