बॉलिवूडची सर्वात हिट जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला ४ वर्षे झाली आहेत. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये या दोघांनी इटलीच्या लेक कोमो येथे लग्न केलं होतं. दीपिका आणि रणवीर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खुश असल्याचं दिसून येतं. काळ त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. दीपिका तिच्या कामात व्यस्त असताना रणवीरने तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडची लाडकी जोडी कायमच चर्चेत असते. रणवीर सिंगचा बिनधास्तपणा त्याच्या चाहत्यांना भावतो. रणवीरने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपिकाला तिच्या ऑफिसमध्ये सरप्राईज दिलं. फुलं आणि चॉकलेट्स घेऊन तिच्या ऑफिसमध्ये गेला.नंतर त्याने इंस्टाग्रामवर जाऊन दीपिकाचा फोटो शेअर केला, ज्यात ती ऑफिसमध्ये तिच्या टीमसोबत काम करताना दिसली. त्याने या फोटोला कॅप्शन दिला आहे की ‘जेव्हा ती तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काम करत असते तेव्हा तुम्ही तिला तिच्या ऑफिसमध्ये असे सरप्राइज दिले पाहिजे,’ त्याच्या या कृतिचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

प्रियांका चोप्राचा नवरा ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; लक्षणं सांगत व्हिडीओ केला शेअर

रणवीर आणि दीपिकाने एकमेकांना २०१२ मध्ये डेट करायला सुरुवात केली होतीपण त्या नात्याबाबत दीपिकाला खात्री नव्हती. तिला सुरुवातीलाच या नात्यात रणवीर सिंगला कोणतीही कमिटमेंट द्यायची नव्हती. कारण त्याआधी तिचं काही वेळा ब्रेकअप झालं होतं. अशात तिला कोणावरही विश्वास ठेवणं कठीण होतं. एका मुलाखतीत दीपिकाने याचा खुलासा केला होता. मात्र आज दोघे एकमेकांबरोबर खुश आहेत.

रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दीपिका-रणवीरने ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले. ‘रामलीला’ चित्रपटापासूनच दीप-वीरच्या लव्हस्टोरीला खऱ्या अर्थाने सुरु झाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh surprises deepika padukone at workplace with flowers chocolates on wedding anniversary spg