अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील एक दिलखुलास अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या मनमोकळ्या स्वभावाने, त्याच्या हटके स्टाईलने तो प्रत्येकाला आकर्षित करून घेत असतो. अनेक बड्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत दिसणाऱ्या रणवीरच्या आवडीनिवडीही जबरदस्त आहेत. त्याला गाड्यांचे वेड आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्याच्याकडे काही जागप्रसिद्ध कंपन्यांच्या गाड्याही आहेत. या ताफ्यात लॅम्बॉर्गिनी, मर्सिडीज, ऍस्टन मार्टिन अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा :सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने गुपचूप उरकले लग्न? व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

‘टॉप गेअर इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत रणवीरला हे गाड्यांचे वेड त्याच्या वडिलांमुळे लागले असल्याचा खुलासा त्याने केला होता. त्याचे वडील सात वर्ष व्यवसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यालाही गाड्यांची आवड लागली, असे त्याने सांगितले होते.

रणवीर मुंबईच्या रस्त्यांवरून अनेकदा त्याच्या या महागड्या गाड्यानमधून फिरताना दिसतो. मर्सिडीज, लॅम्बॉर्गिनी अशा गाड्यांमध्ये प्रवास करताना दिसला. आता त्यानंतर रणवीरने त्याच्या ऍस्टन मार्टिन या गाडीची झलक त्याच्या चाहत्यांना दाखवली. सध्या रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात तो त्याची ही ४ कोटीची निळ्या रंगाची गाडी चालवताना दिसत आहे. यावेळी त्याने फोटोग्राफर्सना पोज देताना दिसला.

त्याने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते, “माझ्या मालकीची अ‍ॅस्टन ही पहिली कार होती ज्यात पॅडल शिफ्टर्स होती. माझ्या बकेट लिस्टमधील आणखी एक गोष्ट म्हणजे लॅम्बॉर्गिनी गाडी विकत घेणे. २०१४ साली मी पहिल्यांदा लॅम्बॉर्गिनीच्या शोरूममध्ये गेलो. त्यानंतर शेवटी ती विकत घेण्यासाठी मी सहा वर्षे वाट पहावी लागली. पण जेव्हा ती विकत घेतला तेव्हा तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता.”

हेही वाचा : शाहरुखच्या ‘डॉन ३’मध्ये होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री, पाहिल्यांदाच शेअर करणार किंग खानबरोबर स्क्रीन

दरम्यान, रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्टबरोबर झळकणार आहे. त्याबरोबरच या वर्षाखेरीस त्याचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader