रणवीर सिंह हा एनबीए इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने दुबईवारी केली होती. दुबईमधील आबू दाबी शहरात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन तर्फे ‘एनबीए आबू दाबी गेम्स २०२२’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला रणवीरने हजेरी लावली होती. त्याने तेथे जाऊन अनेक एनबीए स्टार्संसह लोकप्रिय बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स केला. दरम्यान मुंबईमध्ये परतल्यानंतर तो एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. या सोहळ्यामधला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकमतच्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये नाना पाटेकर, रणवीर सिंह यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बरेचसे राजकीय नेतेही हजर होते. तेव्हा रणवीरने व्यासपीठावर जाऊन ‘बाजीराव मस्तानी’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मल्हारी’ हे गाणं गाऊन दाखवलं. या कार्यक्रमादरम्यान तो मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होता. पुढे त्याने ‘८३’ चित्रपटातील गाणं गात तिरंगा फडकवला.

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल

आणखी वाचा – प्रतीक्षा संपली! सिद्धार्थ कियारा ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर

१९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने विश्वचषक जिंकला होता. या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘८३’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्याला या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. जेव्हा त्याचे नाव उच्चारण्यात आले, तेव्हा तो जागेवरुन उठला. त्यानंतर हवेतच बॅटिंग करायची अ‍ॅक्शन करत तो पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर पोहोचला. तेव्हा तेथे नाना पाटेकर उभे होते. पुरस्कार घेण्यापूर्वी रणवीर त्यांच्या पाया पडला. नानांना मिठी मारल्यावर रणवीरने त्यांच्या गालाचे हलकेच चुंबन घेतले. यावेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

आणखी वाचा – “आपण अधिकच अंधविश्वासू…” प्रसिद्ध अभिनेत्रींनी केलं होतं ‘करवा चौथ’विषयी वादग्रस्त वक्तव्य

रणवीरच्या ‘८३’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला त्याचा ‘जयेशभाई जोरदार’ फ्लॉप झाला. प्रदर्शनापूर्वी योग्य पद्धतीने प्रमोशन न केल्याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. पुढच्या वर्षी त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader