Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचं दुसरं प्री-वेडिंग सध्या जोरदार सुरू आहे. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत सुरू असलेल्या या प्री-वेडिंगचा आज शेवटचा दिवस आहे. २९ मेला सुरू झालेल्या या प्री-वेडिंगमधले फोटो किंवा व्हिडीओ फारसे काही समोर आले नाहीत. बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. कारण अंबानींच्या या प्री-वेडिंगमध्ये ‘नो फोन पॉलिसी’ आहे. पण ओरी व गुरू रंधावाने आपल्या चाहत्यांना अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग होतं असलेल्या क्रूझची झलक दाखवली होती. अशातच या बहुचर्चित प्री-वेडिंगमधला एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये गुरू रंधावाचा परफॉर्मन्स अंबानींचे पाहुणे एन्जॉय करताना दिसत आहेत.

अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाने परफॉर्म केलं. आपल्या दमदार आवाजाने पंजाब गाण्यांवर त्याने अंबानींच्या पाहुण्यांना थिरकायला भाग पाडलं. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा – Video: विशाखा सुभेदारची भाची झळकली ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या व्हिडीओत, गुरू रंधावा स्टेजवर ‘आज फिर किथे चली है मोरनी बनके’ हे गाणं गाताना दिसत असून त्यावर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह, वीर पहाडिया आणि ओरी जबरदस्त नाचताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर पुढे रणवीर सिंह ओरीला उचलून देखील नाचताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाचं ‘हीरामंडी’तील ‘चौदहवी शब’ गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

दरम्यान, काल गुरू रंधावाने क्रूझवर पोहोचण्यापूर्वीचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग ज्या क्रूझवर सुरू आहे ते आलिशान क्रूझ पाहायला मिळालं. यात गुरु रंधावा ‘लेवल सबके निकलेंगे, लेवल सबके निकलेंगे’ म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: “याला म्हणतात प्रोमो”, शिवानी सुर्वे-समीर परांजपेच्या मालिकेच्या नव्या प्रोमोचं नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले…

अनंत-राधिकाचं लग्न कधी?

मुकेश अंबानी व नीता अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी जुलै महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. १२ जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये अनंत राधिका मर्चंटबरोबर सात फेरे घेणार आहे. तसंच इथेच इतर कार्यक्रम आणि रिसेप्शन देखील पार पडणार आहेत. १३ जुलैला रिसेप्शन सोहळा असणार आहे.

Story img Loader