बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतो. रणवीर सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी सध्या वाराणसीत गेला आहे. रणवीरबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉनदेखील आहे. वाराणसी शहरातील नमो घाटाजवळ हा फॅशन शो पार पडला. याचे आयोजन मनीष मल्होत्रा ​​यांनी केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॅशन शोसाठी क्रितीने लाल रंगाचा बनारसी सिल्क लेहेंगा परिधान केला होता. तर सोनेरी रंगाच्या सिल्क कुर्त्यामध्ये रणवीर रॉयल दिसत होता. काळ्या धोतर आणि मॅचिंग शालसह रणवीरने हा लूक पूर्ण केला होता. या फॅशन शोचे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

हेही वाचा… VIDEO: नवरीची मंडपात एंट्री होताच नवरदेवाला अश्रू अनावर; क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट यांच्या लग्नातील व्हिडीओची चर्चा

यादरम्यान रणवीरने काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत रणवीर त्याचा अनुभव सांगत म्हणाला, “मी व्यक्त होऊ शकत नाही असा अनुभव आज मला आला आहे. आयुष्यभर मी शिवाचा भक्त राहिलो आहे आणि पहिल्यांदाच काशीमध्ये दर्शन घ्यायला आलो आहे. माझ्या कुटुंबाची आता नव्याने सुरुवात होणार आहे. हीच ती वेळ होती जेव्हा मला इथे यायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं, आशीर्वाद घ्यायचा होता. मी धन्य झालोय. मी खूप आनंदी आहे. जे मला इथे घेऊन आले त्यांचे खूप खूप आभार. या अनुभवासाठी मी कोटी कोटी प्रणाम करतो.”

रणवीर पुढे म्हणाला, “मी सगळ्या युवकांना सांगू इच्छितो; काशीला या, दर्शन करा, तुम्ही जिथून आला आहात ते विसरू नका.”

हेही वाचा… “मी तुमच्यासमोर हात जोडते…”, सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंतची बिष्णोई गँगला विनंती, म्हणाली…

दरम्यान, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोनने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना गुड न्यूज दिली. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका व रणवीर आई-बाबा होणार आहेत. याबाबत दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुड न्यूज दिली. रणवीरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात रणवीर झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh visited kashi first time shared expeirnce about family and baby dvr