बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना कायम सरप्राइज देत असतो. आतापर्यंत चॉकलेट बॉय, कॉमेन मॅन ते भयावह खलनायकापर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र आता रणवीरला बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीर सध्या त्याच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. यादरम्यान एका संभाषणात, रणवीरने त्याच्या मनातील सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. रणवीर हा गोविंदाचा जबरदस्त फॅन आहे आणि हे त्याने पदोपदी दाखवून दिलं आहे. अगदी लहानपणापासून रणवीर गोविंदाचा चाहता आहे. गोविंदाची एक आयकॉनिक भूमिका साकारायची इच्छा रणवीरने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘राम सेतु’ आता ओटीटीवर; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार

एका मुलाखतीदरम्यान रणवीरने स्पष्ट केलं आहे की त्याला गोविंदाच्या ‘राजा बाबू’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारायची आहे. ‘जुडवा’ आणि ‘राजा बाबू’ हे रणवीरचे प्रचंड आवडते चित्रपट आहेत. ‘जुडवा २’ मध्ये वरूण धवनने काम केलं आहे. त्यामुळे रणवीरने वरूणला बऱ्याचदा ही सक्त ताकीद दिली आहे की त्याने इतर कोणतेही चित्रपट करावेत पण ‘राजा बाबू’ त्याने करू नये. ‘राजा बाबू’चं दिग्दर्शन वरूण धवनचे वडील डेविड धवन यांनी केलं आहे.

रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याच्याबरोबर पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिजदेखील आहेत. याबरोबरच रणवीर आणि आलिया भट्टचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यामध्ये त्यांच्याबरोबर धर्मेंद्र आणि शबाना आजमीदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे.