Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा ५ जुलैला मोठ्या थाटामाटात संगीत सोहळा पार पडला. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या संगीत सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थितीत होती. या संगीत सोहळ्यात प्रसिद्ध गायक, रॅपरचे परफॉर्मन्स झाले. शिवाय बॉलीवूड सेलिब्रिटींसह अंबानी कुटुंबाने देखील परफॉर्मन्स केला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच प्रसिद्ध रॅपर, गायक बादशाहच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ खूप चर्चेत आले आहेत. बादशाहच्या गाण्यांवर बॉलीवूड सेलिब्रिटींसह हार्दिक पंड्या देखील डान्स करताना पाहायला मिळत आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने परफॉर्मन्स केला. जस्टिन बीबरच्या काही तासांच्या या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी तब्बल ८३ कोटी रुपये खर्च केले. तसंच बॉलीवूड सेलिब्रिटी देखील अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात थिरकले. अभिनेता सलमान खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर अशा बॉलीवूडच्या बऱ्याच सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. शिवाय अंबानी कुटुंबातील सदस्य देखील थिरकले. यानंतर बादशाह आणि करण औजाला यांचा परफॉर्मन्स झाला. बादशाह आणि करणच्या रॅप, पंजाबी गाण्यांवर बॉलीवूड सेलिब्रिटींसह हार्दिक पंड्या डान्स करताना पाहायला मिळाला. एवढंच नव्हे तर अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट देखील जबरदस्त डान्स करताना दिसली.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य

हेही वाचा – Video: दुसऱ्या पत्नीविषयी ‘ती’ कमेंट ऐकून भडकला अरमान मलिक अन् लगावली विशाल पांडेच्या कानशिलात, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

बादशाहने अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी बक्कळ मानधन घेतलं आहे. माहितीनुसार, काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी बादशाहने अंबानींकडून ४ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. सध्या बादशाहच्या परफॉर्न्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: अंबानीची होणारी सून राणी मुर्खजीच्या गाण्यावर जबरदस्त थिरकली, व्हिडीओ होतोय व्हायरल

याआधी गुजरातमधील जामनगर येथे पार पडलेल्या अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगमध्ये प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने परफॉर्मन्स केला होता. यासाठी अंबानींनी तब्बल ५२ कोटी रुपये मोजले होते. त्यानंतर फ्रान्समध्ये झालेल्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी कॅटी पेरीला अंबानींनी ४० ते ४५ कोटी रुपये मानधन दिलं होतं.

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Story img Loader