Badshah Denies Traffic Fine Allegations : रॅपर बादशाह नुकताच चर्चेत आला आहे, बादशाहने ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याने गुरुग्राम पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला असे आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. सिंगर-रॅपर बादशाह १५ डिसेंबर २०२४ (रविवार) रोजी गुरुग्राममधील कॉन्सर्टला त्याच्या ताफ्याबरोबर थार गाडीतून जात होता. तेव्हा त्याने रस्त्यावर चुकीच्या दिशेने गाडी चालवली. त्यावर ट्रॅफिक पोलिसांनी १५,५०० रुपयांचा दंड आकारला. मात्र, आता बादशाहने या दंडाच्या आरोपांचे खंडन केले आहे.

बादशाहने वाहतूक नियम तोडल्याच्या आरोपांचे खंडन केले

बादशाहने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. त्याने स्पष्ट केले की, त्याच्याकडे महिंद्रा थार गाडी नाही आणि त्या दिवशी तो स्वतः गाडी चालवत नव्हता. बादशाह इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत म्हणाला, “भाई, माझ्याकडे तर थार गाडीच नाहीये. आणि त्या दिवशी मी गाडी चालवत नव्हतो. मला व्हाइट वेलफायरमध्ये नेलं जात होतं, आणि आम्ही नेहमी जबाबदारीनेच गाडी चालवतो. गाडी असो की खेळ आम्ही जबाबदारीनेच चालवतो.”

हेही वाचा…रणबीर कपूरबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मी तेव्हा रोज…”

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या अहवालानुसार, गुरुग्रामचे पोलिस आयुक्त (वाहतूक) वीरेंद्र विज यांनी सांगितले की, “थार गाडी एक व्यक्ती होती, पानीपतच्या दिपेंद्र हुडा यांच्या नावावर नोंदणीकृत होती आणि ती गाडी त्याच व्यक्तीने चालवली होती. धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे आणि चुकीच्या दिशेने गाडी चालवणे यांसारख्या मोटर वाहन अधिनियमाच्या तीन कलमांखाली हुडाविरुद्ध एकूण १५,५०० रुपयांचा ऑनलाइन दंड आकारला गेला आहे.”

गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, पोलिसांना सोहना रोडवर तीन वाहनांनी चुकीच्या दिशेने गाडी चालवली असल्याची माहिती मिळाली होती. तपासात समोर आले की, हे वाहन गायक बादशाहच्या ताफ्यातील होते. त्यामधील एका गाडीत बादशाह बसला होता. त्या गाडीशिवाय इतर दोन वाहनांवर तात्पुरते वाहन नोंदणी क्रमांक होते. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा…Video : ‘मुंबई-पुणे-मुंबई’; प्राजक्ता माळीने तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहातून सादर केली कविता, चाहते म्हणाले…

बादशाहच्या टीमचे स्पष्टीकरण

ही घटना चर्चेत आल्यानंतर लगेचच बादशाहच्या टीमने एक निवेदन जारी केले आणि या आरोपांचे खंडन केले. त्यांनी स्पष्ट केले की, “१५ डिसेंबर २०२४ रोजी करण औजला कॉन्सर्टनंतर बादशाहशी संबंधित ट्रॅफिक घटनेबाबत आलेल्या निराधार आणि खोट्या आरोपांविरोधात आम्ही हे निवेदन देत आहोत. या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, बादशाह रस्त्यावर चुकीच्या दिशेने वाहन चालवत होता. आम्हाला स्पष्ट करायचे आहे की, हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत.”

Badshah Denies Wrong Side Driving and Traffic Fine
बादशाहने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. (Photo – Badshah/Instagram)

हेही वाचा…Video : “मराठीतील तीन सर्वात छान शब्द कोणते?”, चाहत्याच्या प्रश्नाला मृणाल ठाकूरने दिलं उत्तर; म्हणाली…

टीमने पुढे सांगितले की, “त्या रात्री बादशाह एका सफेद टोयोटा वेलफायर (नोंदणी क्रमांक एचआर ५५ एयू ३३३३) गाडीत प्रवास करत होता. ती गाडी एक परवानाधारक व्यावसायिक चालक चालवत होता. आमच्या ट्रान्सपोर्ट अरेंजमेंटमध्ये एक टोयोटा वेलफायर आणि तीन टोयोटा इनोवा क्रिस्टा गाड्यांचा समावेश होता. बादशाह यांनी यापैकी कोणतीही गाडी चालवली नाही.”

Story img Loader