पंजाबी म्यूझिक इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत रॅपर म्हणून यशस्वी प्रवास करणाऱ्या हनी सिंगला आता कोणाच्या ओळखीची गरज नाही. आपल्या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणाऱ्या हनी सिंगने करिअरमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. पण मधल्या काही वर्षांमध्ये तो संपूर्ण इंडस्ट्रीमधून पूर्णपणे गायब झाला होता. अनेकांना त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि आता सर्वांनाच त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हनी सिंगने त्याच्या मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पाऊल ठेवल्यावर हनी सिंगने स्वतःमध्येसुद्धा बरेच बदल केले आहेत. मानसिक आजारादरम्यान हनी सिंगने अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे. याविषयी खुलासा करताना प्रत्येक दिवशी तो स्वतःच्या मृत्यूची वाट पाहायचा असं त्याने सांगितलं आहे. हा काळ त्याच्यासाठी प्रचंड खडतर होता.

Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल

आणखी वाचा : “स्टारडम हे एक ओझं…” हृतिक रोशनचं स्टार्सच्या लोकप्रियतेबद्दलचं वक्तव्य चर्चेत

‘आज तक’च्या वृत्तानुसार ‘टाइम्स मिरर’शी संवाद साधताना हनी सिंग म्हणाला, “मानसिक स्वास्थ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. नैराश्य वगैरे सर्दी खोकल्यासारखं आहे, आपल्याला पटकन समजतही नाही. मला मानसिक कोविड झाला होता, ज्याला सायकोटिक सीम्पटम किंवा बायपोलर डिसऑर्डर म्हणतात. हा अत्यंत भयानक आजार आहे, अगदी माझ्या शत्रूलासुद्धा हा आजार होऊ नये. मला वेड लागलं होतं, दिवसरात्र मी माझ्या मरणाची वाट बघायचो. सिगरेट दारूचं मला प्रचंड व्यसन लागलं होतं. हा आजार नेमका काय आहे हेच समजून घ्यायला मला ३ वर्षं लागली, त्यापुढे यावर इलाज करून घ्यायला आणखी काही वर्षं गेली. सध्या मी ठीक आहे, यातून बऱ्यापैकी बाहेर आलो आहे.”

याबरोबर हनी सिंगच्या मते नैराश्य, डिप्रेशनसारख्या आजारावर डॉक्टरकडे जाऊन औषधं घेण्यापेक्षा मित्र, परिवार यांच्याशी संवाद साधणं कधीही उत्तम. डॉक्टर्सच्या औषधांमुळे माणूस आणि नैराश्यात जातो असं हनी सिंगनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. एवढंच नाही तर जे डिप्रेशनमध्ये आहेत त्यांना एक सल्ला दिला की त्याला मेसेज करा, तो नक्कीच यातून बाहेर येण्यासाठी मार्ग दाखवेल.