काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायने चाहत्यांना सुखद धक्का दिला. एमीवेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत लग्न केल्याचं जाहीर केलं. अभिनेत्री, गायिका स्वालिनाबरोबर एमीवे बंटाया लग्नबंधनात अडकला. त्यानंतर आता प्रसिद्ध रॅपर रफ्तार बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यामधून रफ्तार पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं निश्चित झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रफ्तार घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर दुसऱ्यांना लग्नबंधनात अडकणार आहे. फॅशन स्टायलिस्ट मनराज जवंदाबरोबर रफ्तार लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या प्री-वेडिंगच्या जल्लोषाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले असून चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत. रफ्तारच्या लग्नाची बातमी वाचून चाहते आनंदी आणि उत्साही झाले आहेत.

जेव्हा एका कंटेंट क्रिएटरने लग्नाच्या पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा रफ्तार दुसरं लग्न करत असल्याचं समोर आलं. या पत्रिकेवर लिहिलं होते, “दिलिन आणि मनराजच्या लग्नसोहळ्यात आपलं स्वागत आहे.” रफ्तारचं खरं नाव दिलिन नायर आहे. त्याचं स्टेज नाव रफ्तार आहे. पण, रफ्तारने अजूनपर्यंत स्वतःच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

एक्सवर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये रफ्तार होणारी पत्नी मनराजबरोबर डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये मनराज मेहंदी दाखवताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, डिसेंबर २०१६मध्ये रफ्तारने कोमल वोहराशी पहिलं लग्न केलं होतं. या लग्नाच्या आधी दोघं पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण लग्नाच्या काही वर्षांनी २०२०मध्ये रफ्तारने कोमलबरोबर घटफोस्ट घेण्याचं निश्चित केलं. परंतु, करोनामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे रफ्तार आणि कोमलने २०२२मध्ये घटस्फोट घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapper raftaar is all set to tie the knot with fashion stylist manraj jawanda pps