Rapper Raftaar Wedding: रॅप इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. अलीकडेच त्याच्या लग्नाची पत्रिका, हळदीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण रफ्तारने स्वतः दुसऱ्या लग्नाबाबत अधिकृतरित्या घोषणा केली नव्हती. पण आता रफ्तारच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायने चाहत्यांना सुखद धक्का दिला. एमीवेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत लग्न केल्याचं जाहीर केलं. अभिनेत्री, गायिका स्वालिनाबरोबर एमीवे बंटाया लग्नबंधनात अडकला. त्यानंतर आता प्रसिद्ध रॅपर रफ्तारने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आज, ३१ जानेवारीला रफ्तार फॅशन स्टायलिस्ट, अभिनेत्री मनराज जवंदाशी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. जवळच्या मित्रांच्या आणि कुटुंबाच्या उपस्थितीत रफ्तार आणि मनराजचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं आहे.
सोशल मीडियावर रफ्तारच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दाक्षिणात्य रिती-रिवाजानुसार रफ्तार आणि मनराजने लग्न केलं आहे. त्यामुळे दोघांनी दाक्षिणात्य पेहराव केलेला पाहायला मिळत आहे. यावेळी रफ्तार हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याने लग्नाच्या पेहरावावर गॉगल घातला आहे. दोघं खूप आनंदात दिसत आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, रफ्तार मनराजला हार घातला दिसत आहे.
Congratulations Raftaar bhai? pic.twitter.com/q4tBBTRAP3
— Govind (@saygovind) January 31, 2025
दरम्यान, रफ्तारचं हे दुसरं लग्न आहे. याआधी डिसेंबर २०१६मध्ये रफ्तारने कोमल वोहराशी पहिलं लग्न केलं होतं. या लग्नाच्या आधी दोघं पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण लग्नाच्या काही वर्षांनी २०२०मध्ये रफ्तारने कोमलबरोबर घटफोस्ट घेण्याचं निश्चित केलं. परंतु, करोनामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे रफ्तार आणि कोमलने २०२२मध्ये घटस्फोट घेतला.
रफ्तारची दुसरी पत्नी कोण आहे?
रफ्तारची दुसरी पत्नी मनराज जवंदाचा जन्म कोलकातामध्ये झाला होता. ती फॅशन स्टायलिस्ट, फिटनेस फ्रीक आणि अभिनेत्री आहे. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मनराजने मुंबईच्या FAD इंटरनॅशनमध्ये स्टायलिंगचा कोर्स केला होता. रफ्तारबरोबर तिने बऱ्याच म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. तसंच ती काही रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकली होती. याशिवाय रफ्तारच्या पत्नीने बऱ्याच जाहिरातीमध्ये काम केलं आहे.