दाक्षिणात्य इंडस्ट्रीबरोबरच बॉलीवूड सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घालणारी आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच रश्मिका मंदाना. २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे ती अनेकदा चर्चेत आली. रश्मिकाला नेहमीच तिचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडतं. खूप कमी जणांना माहीत असेल की, रश्मिकाला एक लहान बहीण आहे आणि त्यांच्यात १६ वर्षांचं अंतर आहे. रश्मिकाची बहीण आता १० वर्षांची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नो फिल्टर नेहा’ या नेहा धुपियाच्या शोला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकानं तिच्या आणि बहिणीच्या नात्याबद्दल सांगितलं. रश्मिका म्हणाली, “तिला चित्रपट खूप आवडतात. अर्थात, ती माझी बहीण आहे आणि तिला माझे चित्रपट नक्कीच आवडणार. जेव्हा मी चित्रपटांमध्ये रडते तेव्हा मला बघून ती तीन-चार तास रडते. तिला असं वाटतं की, माझी बहीण रडतेय, तिला त्रास होतोय. जर चित्रपटात मला कोणी ओरडलं, तर तिला ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात आवडत नाही. ती त्याचा तिरस्कार करते. तिला असं वाटतं की, ही व्यक्ती माझ्या बहिणीला कशी काय त्रास देऊ शकते.”

हेही वाचा… “…आणि मी ट्रेनमधून पडले”; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा ‘तो’ अनुभव, म्हणाली…

“ती नेहमी म्हणत असते की, मला अभिनेत्री व्हायचंय. जेव्हा मी घरी जाते आणि कोणी घरी आलं आणि माझ्याबराबर सेल्फी काढला, तर तीही त्या सेल्फीमध्ये येते आणि मस्त स्माइल वगैरे करते. मला ते सगळं क्यूट वाटतं. पण तिला हे माहीत नाही की, मी कधी उठते, मी किती व्यायाम करते, मी स्किन क्लिनिकला जाते तेव्हा मी काय करते. हे सगळं तिला अजून माहीत नाही. ती मला एक बहीण म्हणून पूर्णपणे ओळखते. पण, एक अभिनेत्री म्हणून जेवढं प्रेक्षक मला ओळखतात, तेवढंच ती मला ओळखते. तर हे सगळं पुढे जाऊन नक्की कसं असेल हे तिला अजून माहीत नाही. ती माझ्या लहान मुलीसारखीच आहे,” असं रश्मिका म्हणाली.

कामामुळे रश्मिकानं तिच्या बहिणीला मोठं होताना पाहिलं नाही. त्याबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, “मला माझ्या बहिणीला मोठं होताना बघायचंय. गेली सात वर्षं मी तिच्याजवळ नव्हते आणि जेव्हाही मी तिला भेटते तेव्हा ती खूप मोठी झालीय, असं मला वाटतं. आता ती उंचीनं जवळजवळ माझ्याएवढी झालीय.”

हेही वाचा… जॅकलिन फर्नांडिसच्या ‘YIMMY YIMMY’ गाण्यावर सहकलाकारांसह थिरकल्या ऐश्वर्या नारकर; नेटकरी म्हणाले, “ताई तुम्हीच…”

दरम्यान, रश्मिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा पुष्पा-२ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रश्मिकाचं ‘छावा’ या हिंदी चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. त्यात विकी कौशलबरोबर ही अभिनेत्री झळकणार आहे. ‘द गर्लफ्रेंड’ हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या एका दिवसानंतर ती साउथ स्टार धनुषबरोबर शूटिंगला सुरुवात करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna 10 years old sister wants to become an actress dvr