लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि साऊथ स्टार विजय देवरकोंडा यांच्या नात्याची खूप चर्चा होत असते. दोघेही एकमेकांसह डेटिंग करत असल्याच्या आणि रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यांनी मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. नुकतंच रश्मिकाला तिच्या आणि विजयच्या बॉन्डबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती त्याच्याबद्दल भरभरून बोलली. विजय तिच्या आयुष्यातला खूप मोठा आधार आहे, असंही ती म्हणाली.

एका मुलाखतीत रश्मिकाला तिच्या सहकलाकरांबरोबर असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. ज्यात अमिताभ बच्चन (गुडबाय), रणबीर कपूर (अ‍ॅनिमल), विजय देवरकोंडा (गीता गोविंदम, डिअर काॅम्रेड), सिद्धार्थ मल्होत्रा (मिशन मजनू) आणि अल्लू अर्जून (पुष्पा) यांच्या नावांचा समावेश होता. त्यावर रश्मिका म्हणाली, “विजू आणि मी एकत्र मोठे झालो आहोत, त्यामुळे मी माझ्या आयुष्यात जे काही करते, त्यात त्याचंही योगदान असतं. मी त्याचा प्रत्येक गोष्टीत सल्ला घेते. मला नेहमी त्याचं मत जाणून घ्यायचं असतं आणि तो प्रत्येक गोष्टीत मी म्हणेन ते बरोबर असं म्हणणारा नाही.”

phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”

हेही वाचा… Bhakshak Trailer: अनाथ मुलींवरील अत्याचाराविरोधात लढणार भूमी पेडणेकर; ‘भक्षक’चा ट्रेलर प्रदर्शित, सई ताम्हणकर दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

पुढे रश्मिका म्हणाली, “विजय स्पष्ट बोलतो. ‘हे चांगल आहे’, ‘हे वाईट आहे’, ‘मला याबद्दल असं वाटतं’ असं तो सरळ सांगतो. माझ्या आयुष्यात कोणीही मला इतका पाठिंबा दिला नसेल, जितका विजयने दिला आहे. म्हणून मी त्याचा खूप आदर करते.”

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २०१८ मध्ये पहिल्यांदा ‘गीता गोविंदम’ मध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही. अनेकदा ते एकत्र दिसतात. गेल्या वर्षी दोघही मालदीवमध्ये एकत्र फिरायला गेले होते आणि अलीकडेच व्हिएतनाममध्येही ते एकत्र फिरायला गेल्याची चर्चा झाली होती. यापूर्वी डेटिंगच्या अफवांबद्दल विचारलं असता “हे सर्व खूप सुंदर आहे. खूप क्यूट आहे हे सगळं,” असं रश्मिका मॅशेबल इंडियाच्या मुलाखतीत म्हणाली होती.

हेही वाचा… “लग्नासाठी मला प्रीती झिंटा…”, सलमान खानने जेव्हा अभिनेत्रीबद्दल केलेलं विधान

दरम्यान, रश्मिकाने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह ‘गुडबाय’ हा चित्रपट केला होता. याचा अनुभव सांगताना ती म्हणाली. “कोणत्याही वयाची कोणतीही व्यक्ती असो, स्त्री-पुरुष किंवा कोणीही असो, बच्चन सर त्यांना सारखाच आदर देतात. त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहेत. ‘ॲनिमल’ मधील सहकलाकार रणबीर कपूरबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी आयुष्यात काहीही करू शकते, असा आत्मविश्वास मला रणबीर कपूरने दिला.”

Story img Loader