‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या धुमाकूळनंतर श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna ) आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात रश्मिका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या बहुचर्चित चित्रपटात ती महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काल, २१ डिसेंबरला रश्मिकाचा ‘छावा’ चित्रपटातील पहिला लूक समोर आला. आज चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आहे. त्यामुळे रश्मिका हैदराबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. पण, यावेळी तिचा एक पाय फॅक्चर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हैदराबाद विमानतळावरील रश्मिका मंदानाचा ( Rashmika Mandanna ) व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क, खांद्यावर छोटीशी बॅग घेऊन रश्मिका गाडीतून उतरताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री लंगडत लंगडत गाडीतून उतरताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर टीमच्या मदतीने ती व्हीलचेअरवर बसते आणि पुढच्या प्रवासाला तिला नेताना दिसत आहे. रश्मिकाचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे.

रश्मिका मंदानाला ( Rashmika Mandanna ) अशा अवस्थेत पाहून चाहते चिंता करत आहेत. अभिनेत्री लवकर बरी होण्यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. “श्रीवल्ली लवकर बरी हो”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, रश्मिका मंदानाच्या ( Rashmika Mandanna ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘छावा’ चित्रपटानंतर ती सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिकंदर’मध्ये पाहायला मिळणार आहे. रश्मिकाला दुखापत झाल्यामुळे ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण लांबवणीवर गेलं होतं. पण, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं समोर आलं. ईदचं औचित्य साधून २५ मार्च २०२५ला सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader