अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची नेहमी उत्सुकता असते. रश्मिकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिचे लेटेस्ट अपडेट्स देत असते. नुकताच तिने तिच्या पूर्वीच्या अफेअरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “आजच्या हिंदी चित्रपटांतील नृत्य…”, आशा पारेख यांनी व्यक्त केली खंत
अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा असलेला ‘गुडबाय’ हा चित्रपट पुढच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती बिझी आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वजण आश्चर्याचकित झाले.
रश्मिकाला मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत विचारलं, “तू एखाद्या पार्टीत तू तुझ्या एक्स बाॅयफ्रेंडला भेटलीस तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?” यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझी माझ्या एक्सबरोबर आजही चांगली मैत्री आहे. मी त्याच्या कुटुंबीयांनाही भेटते आणि मला ते आवडतं. हे काही फार चांगलं नाही, मला माहितेय. पण माझे त्याच्या बरोबरचे संबंध खूप चांगले आहेत.”
हेही वाचा : “आज मी तुमच्यामुळे…”, रश्मिका मंदानाने माधुरी दीक्षितबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
जुलै २०१७ मध्ये रश्मिकाचा रक्षित शेट्टीशी साखरपुडा झाला होता. ‘किरिक पार्टी’ या तिच्या पहिल्या चितरपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी त्यांचं ठरलेलं लग्न मोडलं.