रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती आगामी ‘गुडबाय’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यादरम्यानचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने साधला अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी संवाद, म्हणाली, “आपण दोघीही भारताच्या…”

रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि अमिताभ बच्चन फोटोला एकत्र पोज देताना दिसत आहेत. यावेळी रश्मिका मंदानाने साडी नेसली आहे तर अमिताभ बच्चनही भारतीय पेहरावात दिसत आहेत. हा फोटो नेटकऱ्यांना आवडला आहेच पण लक्ष वेधलं आहे ते रश्मिकाने लिहिलेल्या कॅप्शनने.

हा फोटो शेअर करताना रश्मिका मंदान्नाने एक खास नोट लिहिली, जी खूप वेगाने व्हायरल होत आहे. रश्मिका कॅप्शनमध्ये लिहिले, “माझा अजूनही विश्वास बसत नाही की हे माझ्या आयुष्यात घडत आहे. सरांसोबत चित्रीकरण करायला मिळणं, त्यांच्याशी बोलायला मिळणं, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करायला मिळणं, त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करायला मिळणं, फोटो काढायला मिळणं…ते खरोखर एक उत्कृष्ट कलाकार आहे. एक माणूस म्हणून तर ते रत्न आहेत आणि ते नेहमी माझ्याशी माझ्या चित्रपटातल्य वडिलांप्रमाणे वाद घालतात. या सगळ्यासाठी मी किती कृतज्ञ आहे. ‘गुडबाय’ चित्रपट मला तुमच्याबरोबर करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. हा अनुभव माझ्यासाठी कायमच स्पेशल राहील.”

हेही वाचा : “मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह नीना गुप्ता आणि पवैल गुलाटी असे कलाकार दिसणार आहेत. तसेच या चित्रपटामध्ये सुनील ग्रोव्हर, एली अवराम, साहिल मेहता, अभिषेक खान यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. विकास बहल यांनी ‘गुडबाय’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna shared special experience of sharing screen with big b rnv