Rashmika Mandanna Viral Video: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सध्या ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटात रश्मिका सलमान खानसह प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ३० मार्चला सलमान व रश्मिकाचा हा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यातील रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘सिकंदर’ चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार होता. ज्यामध्ये ३० हजार भाईजाने चाहते सहभागी होणार होते. पण, सलमानच्या सुरक्षेच्या कारणास्तव ‘सिकंदर’ चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द करण्यात आला. त्यानंतर आज २३ मार्चला मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित राहिली होती. पण, या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात रश्मिका मंदानाबरोबर असं काही घडलं; जे पाहून चाहते थोडे घाबरले.
‘फिल्मीग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर रश्मिका मंदानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रश्मिका ‘सिकंदर’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी खास काळ्या रंगाचा शर्ट आणि स्कर्ट अशा आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी रश्मिका एन्ट्री घेत असताना तिचा ड्रेस पायामध्ये येतो आणि ती पडता पडता वाचते. अभिनेत्री पटकन स्वतःला सावरते. तेव्हा तिच्या मागे असलेला एक व्यक्ती तिचा हात पकडतो. या घटनेनंतर रश्मिका थोड्यावेळात थांबते आणि मग पुढे येताना दिसत आहे.
दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाचा आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे लवकरच भारतात चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. परदेशात ‘सिकंदर’ चित्रपटाची अॅडवान्स बुकिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी ३० मार्चला गुढीपाडवा आहे. सोमवारी ३१ मार्चला ईद साजरी केली जाणार आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी १ एप्रिल व २ एप्रिलला सुट्टी आहे. ४ एप्रिलला वीकेंड सुरू होईल. त्यामुळे ६ एप्रिलपर्यंत सलमान खानचा हा चित्रपट जबरदस्त कमाई करू शकतो, असा अंदाजात वर्तवला जात आहे.