रश्मिका मंदानाचा एक बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका तरुणीच्या व्हिडीओमध्ये रश्मिकाचा चेहरा एडिट करून लावण्यात आला आणि तो व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. हा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. बिग बी यांच्या या ट्विटवर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रश्मिका मंदानाने स्वतःच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओबाबत सोडलं मौन, म्हणाली…

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे. पण या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नाही तर झारा पटेल ही ब्रिटिश-भारतीय तरुणी आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला आहे.

बनावट व्हिडीओ –

मूळ व्हिडीओ –

“कायदेशीर दृष्टिकोनातून हे एक गंभीर प्रकरण आहे,” असं रश्मिकाचा हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं.

आता रश्मिकाने बिग बींचे पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत. “माझ्यासाठी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद सर, या देशात मला तुमच्यासारख्या लोकांमुळे सुरक्षित वाटते,” असं तिने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) म्हटलं आहे.

दरम्यान, रश्मिकाने या व्हायरल व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त केली होती. “माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे,” असं ती म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna thanks amitabh bachchan for his support in deepfake viral video matter hrc