एकापाठोपाठ पाच फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. हा अक्षय कुमारचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय. पहिल्या दिवशी चित्रपटाने १० कोटी व दुसऱ्या दिवशी १५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असला तरी यातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे.

‘गदर २’ की ‘ओएमजी २’, कोणत्या चित्रपटाने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? वाचा दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे

शाळांमधील लैंगिक शिक्षण या विषयावर आधारित या चित्रपटाने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय हिंदू परिषदेने या चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका करणाऱ्या अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला किंवा त्याला थप्पड लगावणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी या बक्षिसाची घोषणा केली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आग्रा येथे अक्षय कुमारचा पुतळा आणि चित्रपटाचे पोस्टर्स जाळले.

दुसऱ्यांदा गरोदर होती रानी मुखर्जी, पण गमावलं बाळ; खुलासा करत म्हणाली, “मी पहिल्यांदाच माझ्या…”

अक्षय कुमारने चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका केली आहे. यामध्ये तो बूट घालून दिसतो, कचोरी खरेदी करतो आणि घाण पाण्यात आंघोळ करताना दिसतो. पाराशर यांच्या मते, हा चित्रपट देवाची प्रतिमा मलिन करतो. सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

अभिनेत्री अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन

दुर्गा वाहिनीच्या संस्थापक वृंदावनच्या साध्वी रिथंबरा यांनी चित्रपटावर टीका केली आहे. त्यांच्या वात्सल्य ग्राम आश्रमातील एका भाषणात त्या म्हणाल्या, “हिंदू धर्माच्या उदारतेमुळे बॉलीवूड पुन्हा पुन्हा असा उद्धटपणा करत आहे. ते हिंदू धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मावर भाष्य करायला घाबरतात. याआधीही मोठ्या पडद्यावर हिंदू देव-देवतांचा अपमान झाला आहे. त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धेशी खेळू नका,” असा इशारा त्यांनी दिला.

Story img Loader