Ratan Tata : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची प्राणज्योत ९ ऑक्टोबर या दिवशी मालवली. ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवत होत्या. उद्योग जगतातील दयाळू व्यावसायिक अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या निधनानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही रतन टाटांच्या निधनानंतर पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रतन टाटांच्या निधनावर शोक व्यक्त व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी ही त्यांनी शेअर केल्या. ते म्हणाले, मला नुकतेच रतन टाटा यांचे निधन झाल्याचे कळाले. एका युगाचा अंत झालाय. एक अत्यंत आदरणीय, नम्र परंतु अफाट दूरदृष्टी आणि संकल्पचा दूरदर्शी नेता हरपल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत अनेक अद्भुत क्षण घालवले असल्यासही त्यांनी म्हटलंय. अनेक वेळा आम्ही काही प्रोजेक्ट्सवर एकत्र सहभागी होतो. असं म्हणत माझ्या प्रार्थना असे म्हणत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे पण वाचा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अंबानी कुटुंबीयानी घेतले रतन टाटा यांचे अंत्यदर्शन

९ ऑक्टोबरला रतन टाटांचं निधन

टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा ८६ वर्षांचे होते. २८ डिसेंबर १९३७ रोजी नवल आणि सुनू टाटा यांच्या घरी जन्मलेले रतन हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. रतन टाटा लहान असताना त्यांचे पालक वेगळे झाले आणि त्याचे संगोपन त्यांच्या आजीने केले. १९९१ मध्ये त्यांनी टाटा समूहाची धुरा देण्यात आली होती.

बॉलिवूडकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना अभिनेता बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “उद्योग, परोपकार, भव्यता, मानवतेवर आणि प्राण्यांवरचे त्यांचे प्रेम. त्यांनी देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्यानंतरही ते सर्वांसाठी नेहमीच भारताचे सर्वोत्तम नागरिक असतील. ते नेहमीच आमच्या आठवणींमध्ये राहतील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, रतनशा.”

सलमान खानचीही रतन टाटांसाठी पोस्ट

सलमान खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, “रतन टाटा यांच्या निधनानं खूप दुःख झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” रितेश देशमुखने एक्स मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय, “असा माणूस पुन्हा होणे नाही. रतन टाटा आता आपल्यात नाहीत, याचं खूप दु:ख झालं. त्यांचं कुटुंब आणि प्रियजनांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. गौरवशाली आत्म्याला शांती लाभो”.