Tanuj Virvani Tanya Jacob wedding: एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रीच्या मुलाचे लग्न झाले आहे. अभिनेता तनुज विरवानीने गर्लफ्रेंड तान्या जेकबशी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. तान्या व तनुज यांनी काही महिन्यांपूर्वी एंगेजमेंट केली होती.
तनुज विरवानी आणि तान्या जेकब यांनी २५ डिसेंबर रोजी दुपारी लोणावळ्यात लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला रित्विक धनजानी आणि निक्की तांबोळी यांच्यासह इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. तनुजच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे.
Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित
त्याच्या स्टोरीमधील फोटो व व्हिडीओमध्ये तनुज व तान्या यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. रती अग्निहोत्रीदेखील मुलाच्या लग्नात थिरकताना दिसल्या. गाडीत नाचत सर्वजण लग्नाच्या ठिकाणी पोहोचले.
३७ वर्षीय तनुज हा रती अग्निहोत्री व त्यांचे पूर्वाश्रमीचे पती अनिल विरवानी यांचा एकुलता एक मुलगा आहे. रती व अनिल यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. नंतर ३० वर्षांनी त्यांनी २०१५ साली घटस्फोट घेतला.