Tanuj Virwani wife Tanya Jacob: रणवीर-दीपिकानंतर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याच्या घरी लेकीचे आगमन झाले आहे. ‘योद्धा’ फेम बॉलीवूड अभिनेता तनुज विरवानी बाबा झाला आहे. तनुजची पत्नी तान्या जेकब हिने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तनुजने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. तनुज व तान्या आता एक गोंडस लेकीचे आई- बाबा झाले आहेत.
८० च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री रती अग्निहोत्री आता आजी झाल्या आहेत. त्यांची सून तान्याने मुलीला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी तनुजने तान्याच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर करून ते आई-बाबा होणार असल्याची आनंदाची दिली होती. आता त्यांच्या आयुष्यात लाडक्या लेकीचं आगमन झालं आहे. तनुजने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यावर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अरबाज पटेलविरोधात त्याची गर्लफ्रेंड पोलीस तक्रार करणार? म्हणाली, “तो चुकीचा माणूस…”
रती अग्निहोत्रींचा मुलगा आहे तनुज
३७ वर्षीय तनुज हा रती अग्निहोत्री व त्यांचे पूर्वाश्रमीचे पती अनिल विरवानी यांचा एकुलता एक मुलगा आहे. रती व अनिल यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. नंतर ३० वर्षांनी त्यांनी २०१५ साली घटस्फोट घेतला होता.
तनुज-तान्याचे लग्न
तनुज विरवानी आणि तान्या जेकब यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २५ डिसेंबर २०२३ रोजी लोणावळ्यात लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाला रित्विक धनजानी आणि निक्की तांबोळी यांच्यासह इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
तनुजने ‘वन नाइट स्टँड’, ‘पुरानी जीन्स’, ‘योद्धा’, ‘कोड एम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याने सनी लिओनीबरोबर ‘स्प्लिट्सव्हिला’ हा शो होस्ट केला आहे.