बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा आज वाढदिवस. एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या रवीनाने बरेच हिट चित्रपट दिलेत. आपल्या करिअरबरोबरच रवीना अनेकादा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. रवीनाचं नाव काही अभिनेत्यांशीही जोडलं गेलं होतं ज्यात अक्षय कुमारचं नाव घेतलं जातं. एकदा तर रवीनामुळे अक्षय कुमारला सनी देओलचा मारही खावा लागला होता. जाणून घ्या त्यावेळी नक्की काय घडलं होतं…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावून जाणाऱ्या अक्षय कुमारचे कलाविश्वामध्ये प्रत्येकाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे कोणत्याही कलाकाराशी त्याचे वाद झाल्याचं ऐकिवात नाही किंबहुना तशा चर्चाही कधी चाहत्यांमध्ये रंगलेल्या नाहीत. पण सगळ्यांशी मैत्रीपूर्ण नातं जपणाऱ्या अक्षयचे एकेकाळी सनी देओलसोबत वाद झाले होते. विशेष म्हणजे या वादाला अभिनेत्री रवीना टंडन कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर रवीनामुळे सनीने अक्षयच्या कानशिलातही लगावली होती.

आणखी वाचा- “…म्हणून प्रत्येक गाडीची नंबर प्लेट सारखीच,” रवीना टंडनने अनेक वर्षांनी केले गुपित उघड

ट्विंकल खन्नासोबत लग्नगाठ बांधलेल्या अक्षयचं कधी काळी रवीना टंडनवर प्रचंड प्रेम होतं. या दोघांनी जवळपास ३ वर्ष एकमेकांना डेट केलं. पण काही कारणास्तव या दोघांमध्ये दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर रवीनाची झालेली अवस्था पाहून रागाच्या भरात सनीने अक्षय कुमारवर हात उचलला होता.

‘जोर’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना एकेदिवशी रवीना सेटवर येऊन अचानकपणे रडू लागली. तिची ही अवस्था पाहून सनीने तिला रडण्याचं कारण विचारलं. त्यावर रवीनाने अक्षयसोबत ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. रवीनाच्या रडण्यामागचं खरं कारण समजल्यानंतर सनी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने अक्षयच्या कानशिलात लगावली.

आणखी वाचा- ‘त्या’ एका ट्विटवरून रवीना टंडनचा राग झाला अनावर, म्हणाली, “ती लोकं शैतानापेक्षा…”

दरम्यान, याप्रकारनंतर सनीच्या आणि रवीनाच्या अफेअरच्याही चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु याविषयी दोघांनीही मौन बाळगणं पसंत केलं. सध्या रवीना कलाविश्वापासून दूर आहे. तर अक्षय कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे मागचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले असले तरीही नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राम सेतु’कडून प्रेक्षकांना आणि अक्षयलाही बऱ्याच अपेक्षा आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon birthday know why sunny deol slap akshay kumar on set of zor mrj