रवीना टंडन व तिच्या ड्रायव्हरची रस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ २ जून रोजी व्हायरल झाला होता. मुंबईतील वांद्रे भागेत रिझवी कॉलेजजवळ रवीना टंडनचा पार्किंगवरून काही लोकांशी वाद झाला. यानंतर स्थानिकांनी तिच्या भांडण केलं आणि तिला धक्काबुक्की केली होती. या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. या प्रकरणावर आता रवीना टंडनने मौन सोडलं आहे.

रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. रवीनाने सर्वात आधी आपल्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले आहे आणि या घटनेतून ती काय धडा शिकली हे तिने सांगितलं आहे. रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या चाहत्यांसाठी एक पोस्ट लिहिली आहे. “प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ‘मोरल ऑफ द स्टोरी… आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही लावून घ्या,” अशी पोस्ट तिने केली आहे.

raveena tandon reacts on parking clash
रवीना टंडनची इन्स्टाग्राम स्टोरी

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

नेमकं प्रकरण काय?

रवीना दारूच्या नशेत होती आणि आपल्यावर हल्ला केला, असे खोटे आरोप या लोकांनी केले होते. या आरोपांवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आणि अभिनेत्री किंवा तिचा ड्रायव्हर दारू प्यायलेले नव्हते, असं सांगितलं. सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांव्यतिरिक्त घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनेही सांगितलं की रवीना दारू प्यायलेली नव्हती.

‘हॅलो छायाजी, मैं…’, जेव्हा कोकणात असलेल्या छाया कदमांना तब्बूने केला होता फोन

सीसीटीव्हीमुळेच रवीना व तिच्या ड्रायव्हरला या प्रकरणात क्लिनचिट मिळाली होती. रवीना टंडनच्या कारने कोणालाही दुखापत झाली नाही हे त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्ध झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा ड्रायव्हर बेजबाबदारपणे गाडी चालवत नव्हता. तो बंगल्याबाहेर कार उभी करण्यासाठी रिव्हर्स घेत होता, तेव्हा तीन महिला आणि एक पुरुष त्याच्याशी भांडायला आले होते.

“आता या क्षणी जर…”; एक्स बॉयफ्रेंडच्या ‘त्या’ दाव्यावर स्पष्टच बोलली मराठमोळी अनुषा दांडेकर

मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीना टंडनने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप करत या घटनेचे व्हिडीओ व्हायरल केले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रवीनाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पार्किंगवरून झालेला वाद थेट पोलिसांत पोहोचला. पण सीसीटीव्ही फुटेजमुळे रवीना व तिच्या ड्रायव्हरवर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळेच आता रवीनाने सीसीटीव्ही फुटेज व डॅशकॅमचा उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे.

Story img Loader