ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिच्या सुखी संसारामध्ये मग्न आहे. शिवाय कुटुंब सांभाळत ती तिच्या कामामकडेही तितकंच लक्ष देताना दिसते. कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना ऐश्वर्याचं नाव काही अभिनेत्यांशी जोडलं गेलं. सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्याबरोबरचं तिचं नातं तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण काही वर्षांपूर्वी तिचं अक्षय कुमारशी असलेल्या नात्याबाबत बरीच चर्चा रंगली होती. अक्षयशी नाव जोडलं जात आहे हे समजल्यानंतर ऐश्वर्याला राग अनावर झाला होता.
ऐश्वर्याने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये अक्षय व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. १९९६मध्ये ऐश्वर्या व अक्षय एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. याचदरम्यान या दोघांचं स्विमिंग पूलमधील हॉट फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं. याच फोटोशूटनंतर ऐश्वर्या व अक्षयच्या नात्याबाबत बऱ्याच चर्चा रंगू लागल्या. मात्र त्यावेळी अक्षय व रवीना टंडन एकमेकांच्या प्रेमात होते.
ऐश्वर्या व अक्षय एकत्र असताना रवीनाने त्यांना पकडलं होतं असं एका मासिकामध्ये छापून आलं होतं. हे मासिक वाचताच ऐश्वर्याचा राग अनावर झाला होता. यावेळी तिने या मासिका विरोधात २ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. याबाबतच ‘कॉफी विथ करण’मध्ये ऐश्वर्याने म्हटलं की, “माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच एक घटना घडली. तेव्हा मी त्या मासिकालाच कोर्टात खेचलं होतं”.
“अक्षय व मला रवीना टंडने एकत्र पकडलं असं त्या मासिकामध्ये म्हटलं होतं. पण त्यावेळी तिथे कोण होतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आम्हा दोघांना एकत्र पाहून रवीनाला भडकली आहे असं बोलण्यात आलं. पण हे सगळं अगदी खोटं होतं”. अक्षयबरोबर नाव जोडल्यानंतर सुरु असलेल्या चर्चांना ऐश्वर्याने त्यावेळी सडेतोड उत्तर दिलं होतं.