बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनप्रमाणेच तिची मुलगी राशा थडानी नेहमीच चर्चेत असते. राशाने नुकतंच आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. रविनाने राशाच्या पदवी ग्रहण सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या राशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राशा थडानीला पाहून पापाराझींनी तिच्याकडे मिठाईची मागणी केली. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पापाराझी तिच्याकडे मिठाई मागत होते. तेव्हा राशाने त्यांना पुढच्या वेळी नक्की मिठाई देईन, असे वचन दिले. राशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राशाचा हा नम्रपणा बघून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.
राशाच्या नम्रपणाबरोबरच तिच्या लूकची चांगलीच चर्चा सुरू आहे. या वेळी राशाने काळ्या रंगाची स्पेगेटी, क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिम जीन्स परिधान केली होती. अनेक युजर्सनी राशाच्या लूकची तुलना तिची आई रवीना टंडनशी केली आहे. राशाने अद्याप बॉलीवूडमध्ये प्रवेश केला नसला तरी ती लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. अनेकदा रविनाने राशाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.