बॉलीवूड कलाकारांचे नाव अनेकदा एकमेकांशी जोडले जाते. एखादा अभिनेता व अभिनेत्री एकत्र फिरतानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. या व्हिडीओनंतर दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण येते. चाहत्यांनाही कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यात रस असतो. कलाकारांप्रमाणे प्रेक्षक त्यांच्या मुलांच्या रिलेशनशिनबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. दरम्यान अशाच एका अभिनेत्री व अभिनेत्याच्या मुलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनप्रमाणेच तिची मुलगी राशा थंडानीही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर होत असतात. दरम्यान राशा सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. राशा अरबाज खान व मलायका अरोराचा मुलगा अरहान खानला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राशा व अरहानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे एकत्र फिरताना दिसत आहे.
राशा व अरहान मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसून आले. यावेळी राशाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता तर अरहानने पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्यां रंगाची पॅन्ट परिधान केली होती. राशा व अरहानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याच महिन्यात २ जानेवारीला राशा व अरहानला एकत्र बघण्यात आले होते. मात्र, पापराझींना बघताच दोघे गाडीत जाऊन बसले होते.
हेही वाचा- ‘या’ फ्लॉप चित्रपटामुळे करोना काळात टीमचं घर चाललं; रोहित शेट्टीचा खुलासा, म्हणाला…
रवीना टंडनचे अरबाज खानसोबत खूप चांगले बाँडिंग आहे. अरबाज व शूरा खानच्या लग्नात ती मुलगी राशा थडानीबरोबर सहभागी झाली होती. आई -वडिलांप्रमाणेच आता राशा व अरहानमध्येही चांगले बॉन्डिंग असल्याचे दिसून येते. या अगोदरही अनेकदा दोघांना एकत्र बघण्यात आले होते. यावरुन दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.