बॉलीवूडच्या कलाकारांची मुलं आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. २०२३मध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, श्रीदेवींची मुलगी खुशी कपूर यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर गेल्या वर्षी आमिर खानचा मुलगा जुनैद खानने ‘महाराज’ चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आता रवीना टंडनची १९ वर्षांची मुलगी मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं असून तिच्या जबरदस्त डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. नेटकरी रवीना टंडनच्या मुलीची तुलना सुहाना खान, खुशी कपूरसह कतरिना कैफबरोबर करत आहेत.
रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं नाव राशा थडानी आहे. ती ‘आजाद’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार झाली आहे. याच चित्रपटातील तिचं पहिलं गाणं ‘उई अम्मा’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावर राशाचा डान्स पाहून नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. तिने आपल्या डान्ससह हावभावाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
राशा थडानीचं ‘उई अम्मा’ गाणं ४ जानेवारीला प्रदर्शित झालं. मधुबंती बागने हे गाणं गायलं असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य गीतकार आहेत. या गाण्यातील जबरदस्त डान्समुळे राशा चांगलीच भाव खाऊन गेली आहे. त्यामुळेच तिचं कौतुक होतं आहे.
हेही वाचा – दोन लोकप्रिय मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, नेटकरी म्हणाले, “एवढ्या लवकर का संपवली?”
राशाचं ‘उई अम्मा’ गाणं पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं की, हे खरं पदार्पण आहे. तिचे हावभाव जबरदस्त आहेत. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “सुहाना खान आणि खुशी कपूरपेक्षा राशाने खूप छान परफॉर्मन्स केला आहे. ती भविष्यातली कतरिना कैफ आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तू आईचं नाव उज्वल केलंस.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, पुढच्या पिढीतली बॉलीवूडची सुपरस्टार आहेस.
हेही वाचा – Video: न्यू इअरचं सेलिब्रेशन करून रणबीर कपूर-आलिया भट्ट राहासह मुंबईत परतले, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, राशाचा ‘आजाद’ चित्रपट अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राशाबरोबर अमन देवगण बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी ‘आजाद’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. या कथेचा खरा हिरो घोडा आजाद आहे. टीझरमध्ये अजय देवगण आणि अमन देवगणला आजाद घोड्याबरोबर पाहू शकता. तसंच परदेशातील मुलीच्या भूमिकेत राशा टीझरमध्ये झळकली आहे.