९० च्या काळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन उत्तम नर्तिकाही आहे. अलीकडेच ‘कर्मा कॉलिंग’ या वेबसीरिजमध्ये ती झळकली. रवीना आजही अभिनय क्षेत्रात तितकीच सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या तिच्या मुलाखतीमुळे सध्या ती चर्चेत आहे. रवीना टंडनने “छैया छैया” या सुपरहिट गाण्यासाठी नकार दिला होता. या निर्णयावर ती उघडपणे बोलली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीबीसी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली की, तिला ‘छैया छैया’ हे गाणं ऑफर करण्यात आलं होतं, ज्यात शाहरुख खान आणि मलायका अरोरा आहेत. ‘रक्षक’ चित्रपटातील ‘शेहेर की लडकी’ या गाण्याच्या यशानंतर तिला ‘छैया छैया’ची ऑफर आली होती.

हेही वाचा… लग्नानंतर तीन वर्षांनी यामी गौतम होणार आई; पती गूड न्यूज देत म्हणाला, “बाळाला माहीत असणार…”

‘छैया छैया’ या गाण्याचा किस्सा सांगत रवीना पुढे म्हणाली, “माझं ‘शेहेर की लडकी’ हे गाणं तेव्हा खूप हिट झालं होतं. म्हणूनच ‘छैया छैया’ची ऑफर मला देण्यात आली आणि मला आठवतयं, तेव्हा शाहरुख म्हणाला होता, मणि सरांना तुझ्याशी बोलायचे आहे आणि आमच्यासाठी तू हे गाणं करावं अशी त्यांची इच्छा आहे.”

हेही वाचा… ‘आदिपुरुष’च्या अपयशाबाबत सैफ अली खानने पहिल्यांदाचे सोडले मौन; म्हणाला, “मी स्वत:ला कधीच…”

रवीनाने नंतर नमूद केले की, तिला खूप अस्वस्थ वाटत होते, कारण तिला मणिरत्नमसह काम करायचे असले तरी परत एक आयटम सॉंग ऑफर केल्यामुळे तिला स्टिरियोटाइप केले गेले असते. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “ तेव्हा मी खूप विचित्र परिस्थितीत अडकले होते, कारण मला मनापासून मणिरत्नम सरांसोबत काम करायचं होतं; परंतु मला पुन्हा फक्त आयटम सॉंग ऑफर केलं जात होतं आणि तेव्हा तुमच्या कामानुसार तुमचं परीक्षण व्हायचं.”

रवीना पुढे म्हणाली, “ती एक आव्हानात्मक परिस्थिती होती. मला माहीत होतं की, हे गाणं रॉक सॉलिड आहे. माझ्याकडे तेव्हा एकचं पर्याय होता, हे गाणं असं होतं की तुम्ही ते ऐकलं असतं आणि पूर्णपणे त्याच्या प्रेमात पडला असता; खरं तर हा निर्णय फारच अवघड होता.”

रवीना असंही म्हणाली की, तिला ‘डर’, ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिकांची ऑफर देण्यात आली होती, ज्यात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. परंतु, तिने हे चित्रपटही नाकारले. मात्र, तिने शाहरुख खान आणि त्याच्या कामाचे कौतुक केले. किंग खानची स्तुती करत ती म्हणाली, “मला शाहरुख आवडतो, तो खरचं खूप चांगला माणूस आहे.”

हेही वाचा… आलिशान बंगला सोडला, लक्झरी गाडी विकली, चित्रपटसृष्टीपासूनही दूर; अभिनेता इम्रान खान सध्या करतोय तरी काय?

दरम्यान, रवीनाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर तिच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘कर्मा कॉलिंग’चा प्रीमियर २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताकदिनी Disney+ Hotstar वर प्रदर्शित झाला. रुची नारायण दिग्दर्शित या सीरिजमध्ये रवीना टंडन, वरुण सूद, नम्रता शेठ आणि विक्रमजीत विर्क महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रवीना शोमध्ये इंद्राणी कोठारीच्या भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतेय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon denied chaiyya chaiyya song which stars shah rukh khan and malaika arora dvr