रवीना टंडन ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष ती तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आली आहे. नुकतीच रवीनाने ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. अभिनेत्रीने अतिथी परीक्षक म्हणून सहभागी झाल्याने कार्यक्रमातील एका स्पर्धक जोडीने ‘टिप टिप बरसा पानी’ या तिच्या आयकॉनिक गाण्यावर सादरीकरण केलं. याच निमित्ताने रवीनाने ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव सांगितला.
हेही वाचा : “माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा…”, किरण मानेंनी शाहरुख खानसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भावा तुझा…”
रवीना या गाण्याविषयी सांगताना म्हणाली, “बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं. या गाण्यात मला पायात चपला घालायच्या नव्हत्या. त्यामुळे संपूर्ण गाणं आम्ही अनवाणी शूट केलं. बांधकाम सुरु असल्याने त्या इमारतीमध्ये सर्वत्र गोगलगायी होत्या. मी साडी नेसली होती आणि माझ्या गुडघ्यावर जखमा होऊ नयेत म्हणून पॅड्स घातले होते. एवढी काळजी घेऊनही घरी परतल्यावर माझ्या गुडघ्याला असंख्य जखमा झाल्याचं मी पाहिलं.”
हेही वाचा : “अजून एक स्वप्न पूर्ण…”, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा नव्या घरात गृहप्रवेश, अनोख्या नेमप्लेटने वेधलं लक्ष
अभिनेत्री पुढे म्हणाली, “जखमा झाल्याने मला टिटेनसचं इंजेक्शन घ्यावं लागलं. पावसात भिजल्यामुळे पुढचे दोन दिवस मी आजारी होते. तुम्ही जे पडद्यावर पाहता तशा ग्लॅमरस गोष्टी नसतात. रिहर्सल किंवा शूटिंगदरम्यान दुखापती होणं सामान्य गोष्ट असते. आपण सतत काम करत राहायचं…वेदना झाल्या तरी चेहऱ्यावरचं हास्य कधीही कमी करायचं नाही. प्रत्येक कलाकार आणि कोरिओग्राफरला असे संघर्ष करावे लागतात.”
हेही वाचा : अतुल कुलकर्णी : भूमिका घेणारा, सामाजिक कामात योगदान देणारा कलावंत
दरम्यान, १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. यामध्ये रवीना टंडनसह अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली आहे.