रवीना टंडन १९९० च्या दशकापासून बॉलीवूडचा भाग आहे. त्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रवीनाने तीन दशकांहून अधिक काळातील तिच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. इतकंच नाही तर तिने वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टींचा सामना केला आहे. रवीना व अक्षय कुमारचं अफेअर होतं. आता दोघांचा घटस्फोट होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण त्याची चर्चा अजूनही होते.
“बिचारे गोविंदा, त्यांना…”, ‘गदर २’ च्या दिग्दर्शकाने अभिनेत्याला लगावला टोला, नेमकं काय घडलं?
‘लेहरेन रेट्रो’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवीनाने सांगितलं की ती ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. “मला वाटलं आणि मी वेलकम साइन केला आहे,” असं रवीनाने सांगितलं. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अक्षय आणि रवीना यांनी एका कार्यक्रमात स्टेज शेअर केला होता. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेत कौतुकही केलं होतं. याबाबत तिला विचारलं की रवीनाने पती अनिल थडानीशी तिच्या पूर्वीच्या रिलेशनशिपबद्दल कधी चर्चा केली आहे का? त्यावर रवीना म्हणाली की जरी ते एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखत नसले तरी ते एकमेकांना ओळखतात. त्यामुळे त्यांनी त्याबाबत कधीच कोणतीही चर्चा केली नाही.”
“त्यांच्या आणि त्यांच्या भूतकाळातील अतिशय वैयक्तिक गोष्टींवर चर्चा करणं त्यांना आवडत नाही आणि मीदेखील जुन्या गोष्टींबाबत चर्चा करणे पसंत करत नाही,” असं ती म्हणाली. दरम्यान, रवीनाला भेटण्यापूर्वी अनिल थडानींचा घटस्फोट झाला होता. तर दुसरीकडे रवीनाचीदेखील अक्षयशी एंगेजमेंट झाली होती आणि नंतर नातं तुटलं होतं. आपण आपापल्या भूतकाळाविषयी एकमेकांशी चर्चा करत नसल्याचं रवीनाने सांगितलं.
अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान एकाला मारलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणाली, “मी जे केलं ते…”
रवीनाने पती अनिल थडानीबरोबरच्या तिच्या प्रेमकथेबद्दल खुलासा केला. तिने अनिलला पहिल्यांदा एका व्हॅलेंटाईन डे पार्टीमध्ये पाहिलं होतं. परंतु त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. “आम्ही भेटलो आणि आम्ही ४ ऑगस्ट २००३ रोजी बोलू लागलो आणि फेब्रुवारी २००४ मध्ये आमचे लग्न झाले,” असं तिने सांगितलं. अनिलने तिचा पहिला चित्रपट ‘पत्थर के फूल’ चे वितरण केले होते हे तिला माहीत नव्हतं, पण जेव्हा ती ‘स्टम्प्ड’ नावाचा चित्रपट बनवत होती तेव्हा त्यांची पहिली भेट झाली आणि दोघे कामासाठी भेटले होते असं रवीना म्हणाली.
रवीनाला रिलेशनशिपमधील फसवणुकीबद्दल विचारण्यात आलं. अक्षयने फसवणूक केल्याने त्यांचं ब्रेकअप झालं होतं, असं म्हटलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर तिला हा प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्याला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही, असं ती म्हणाली. “माझ्या मते प्रत्येक नाते विश्वास, प्रेम, प्रामाणिकपणा या गोष्टींवर टिकून असते. केवळ रोमँटिक नातेसंबंध नाही तर हा नियम जीवनातील सर्व प्रकारच्या नातेसंबंधांना लागू होतो,” असं रवीनाने नमूद केलं.