अभिनेत्री रवीना टंडन गेली अनेक दशकं आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिचे चित्रपट पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. कारण तिचा प्रत्येक चित्रपट हा नावीन्यपूर्ण असतो. कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अनेकदा चर्चेत असते आणि याचं एक कारण म्हणजे तिची मुलगी राशा थडानी. रवीनाने आतापर्यंत कधीही ऑनस्क्रीन किसिंग सीन दिलेला नाही. पण तिच्या मुलीने जर ऑनस्क्रीन एखाद्या अभिनेत्याला किस केलं तर रवीनाला हे चालेल का हे तिने स्वतः सांगितलं आहे.
रवीना टंडन हिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिने तिच्या आतापर्यंतच्या संपूर्ण करिअरमध्ये कधीही कुठल्या चित्रपटामध्ये किसिंग सीन दिलेला नाही. पण जर भविष्यात तिच्या मुलीने ते केलं तर रवीनाची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल तिने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “…म्हणून प्रत्येक गाडीची नंबर प्लेट सारखीच,” रवीना टंडनने अनेक वर्षांनी केले गुपित उघड
नुकत्या लेहेरे रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “जर ती स्वतः कम्फर्टेबल असेल तर काय हरकत आहे? पण जर ती कम्फर्टेबल नसेल तर तिला मनाविरुद्ध कुठलेही गोष्ट करण्यासाठी कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.” तर आता रवीनाचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.
हेही वाचा : “तो मला रक्ताने पत्र लिहायचा…”; रवीना टंडनचा ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा
दरम्यान, रवीनाची मुलगी राशा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिषेक कपूर यांच्या आगामी चित्रपटात ती झळकणार आहे. दुसरीकडे ती तिचं शिक्षणही पूर्ण करत आहे.