बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटली असली तरी आजही चाहते ते तितक्यात उत्सुकतेने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. करण जोहरच्या या चित्रपटातील तिन्ही पात्रे विशेष गाजली होती. मात्र नुकतंच अभिनेत्री रवीना टंडनने या चित्रपटाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही तिचा अभिनय तेवढाच ताकदीचा आहे. रवीना टंडनचे नाव चित्रपटसृष्टीत मोठ्या आदराने घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच रवीना टंडनने करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाबद्दल एक खुलासा केला आहे. “मला या चित्रपटाबद्दल विचारणा करण्यात आली होती. पण मी यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता”, असे तिने सांगितले आहे.

kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”

“मला करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी विचारणा केली होती. पण मी मात्र या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्याचे कारण म्हणजे काजलच्या तुलनेत माझे पात्र फारच कमी वेळ पडद्यावर दिसणार होते. ते पात्र फारच लहान होतं”, असे ती म्हणाली.

“मी आणि काजलने एकत्र सिनेसृष्टीत पदार्पण केले. आम्ही एकाच वयाच्या आहोत. माझे करिअर चांगले सुरु होते. त्यामुळे ज्यात माझी भूमिका ही लहान असेल, अशा चित्रपटात मला काम करायचे नव्हते. यामुळेच मी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कदाचित याच कारणामुळे करण जोहरने मला अद्याप माफ केले नसावे”, असेही तिने म्हटले.

दरम्यान रवीना टंडनला ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या टीना मुखर्जी या पात्रासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र तिने याला नकार दिला होता. त्यानंतर ही भूमिका राणी मुखर्जीने साकारली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तिला या चित्रपटाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. सध्या रवीना ही ‘केजीएफ २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Story img Loader