अक्षय कुमार व रवीना टंडन यांची रविवारी ७ मे रोजी एका इव्हेंटमध्ये भेट झाली. तेव्हापासून या दोघांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असलेल्या अक्षय व रवीना यांचं ब्रेकअप झालं, त्यानंतर ते पुन्हा कधीच एकत्र दिसले नव्हते. आता जवळपास दोन दशकानंतर ते एकत्र दिसले. इतकंच नव्हे तर त्यांनी एकमेकांशी संवादही साधला. तसेच रवीनाने अक्षयचं कौतुकही केलं.

मंचावर येत मिठी मारली अन्…, ब्रेकअपनंतर २२ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र दिसले अक्षय कुमार-रवीना टंडन

रविवारी रात्री मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात रवीना टंडन आणि अक्षय कुमारही पोहोचले होते. या कार्यक्रमाच्या काही व्हिडीओ क्लिप आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघे एकमेकांशी बोलता दिसत आहेत. त्यांना इतक्या वर्षांनी एकत्र पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही स्टेजवर उभे आहेत. रवीना अक्षयचे कौतुक करताना दिसत आहे. “९० च्या दशकातील एक रॉकस्टार, जो आजही रॉकस्टार आहे आणि जो नेहमीच रॉकस्टार राहील,” असं रवीना म्हणताना दिसत आहे. तसेच नेटकरी देखील या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत.

akshay raveena
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

काही नेटकऱ्यांनी या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला आहे. तर काहींनी ही गोष्ट अशक्य असल्याचं म्हटलं आहे. काही जणांनी तर “या दोघांना एकत्र पाहण्याचं स्वप्न पूर्ण झालं”, असंही म्हटलं आहे. एकंदरीतच दोघांच्या फोटोंची व व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे.

akshay raveena
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत रवीनाने ब्रेकअपनंतरच्या आयुष्याबद्दल सांगितलं होतं. “अक्षयशी ब्रेकअपनंतर मी दुसऱ्या कोणास तरी डेट करू लागली आणि अक्षयही इतर कुणाला तरी डेट करत होता, त्यामुळे मला कधीच ईर्ष्या वाटली नाही,” असं तिने म्हटलं होतं.