बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन विविध कारणांमुळे चर्चेत असते. दर्जेदार अभिनयाने रवीनाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ २’मधील रवीनाच्या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले. मात्र, आजही रवीनाला करण जोहरचा तो चित्रपट नाकारल्याची खंत वाटते. खुद्द रवीनाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘शूल’च्या सेटवर मिळालेल्या सुरक्षेबद्दल रवीना टंडन म्हणालेली “मी इंदिरा गांधी…” मनोज बाजपेयी यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Actor Varun Aradya Ex Girlfriend Varsha Kaveri
Actor Varun Aradya: पहिल्या प्रेयसीचे फोटो, व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिल्यामुळं कन्नड अभिनेत्यावर गुन्हा दाखल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

रवीनाने १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मोहरा, दिलवाले, अंदाज अपना अपना, लाडला आणि यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. दोन वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर, जेव्हा रवीनाला बॉलीवूडमध्ये परतायचे होते तेव्हा तिला करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची ऑफर आली. मात्र, रवीनाने तो चित्रपट नाकारला. आजही रवीनाला हा चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप होतो.

रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात टीनाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. तिने नकार दिल्यानंतर ही भूमिका राणी मुखर्जीला देण्यात आली. रवीना म्हणाली की, तिला तिचे करिअर शून्य वाटत होते. अशा परिस्थितीत दुसरी मुख्य भूमिका साकारून तिला तिचे करिअर खराब करायचे नव्हते.

हेही वाचा- दिग्दर्शक अनुराग कश्यपचा होणारा जावई नेमकं करतो काय? त्याची आणि आलियाची ओळख झाली कशी? घ्या जाणून

रवीना म्हणाली, “करण जोहर माझ्याकडे आला तेव्हा माझे करिअर शून्यावर होते. करणला समजावून सांगणे माझ्यासाठी खूप अवघड होते. मला काजोलची भूमिका करणे फायदेशीर वाटले. रवीनाला या चित्रपटात दुसरी प्रमुख भूमिका करायची नव्हती. ही भूमिका नाकारल्याचा रवीना टंडनला आजही पश्चात्ताप होतो. “करणला मी ज्या परिस्थितीत होते ते समजावून सांगणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मला आजपर्यंत याचा खरोखरच पश्चात्ताप होत आहे आणि आम्ही अजूनही एकत्र काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.”