अभिनेत्री रवीना टंडन नेहमी चर्चेत असते. गेली ३२ वर्षे ती अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. आज तिचे नाव बॉलीवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ती एका चित्रपटात काम करण्यासाठी करोडो रुपये घेते. पण तिची पहिली कमाई किती होती हे तुम्हाला माहीत आहे का? खुद्द रवीनाने अनेक वर्षांनंतर याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “कधी कधी मला शाहरुख खानसारखं…”; ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या यशाबाबत अदा शर्माचे मोठं वक्तव्य

नुकतीच रवीना टंडन ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सहभागी झाली होती. ‘मदर्स डे’ स्पेशल एपिसोडमध्ये ती शोमध्ये दिसली होती. लेखिका सुधा मूर्ती आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे निर्माते गुनीत मोंगा हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. या वेळी रवीनाला तिच्या पहिल्या पगाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. रवीनाने याबाबत खुलासा केला आहे. रवीना म्हणाली, माझा पहिला पगार ५०० ते ६०० रुपये होता. एका जाहिरातीत काम केल्यानंतर तिला हा पगार मिळाला होता.

रवीना टंडनने सांगितले की, तिच्या आईकडे टेपरेकॉर्डर होता, ज्यामध्ये ती रोज सकाळी जुनी गाणी ऐकत असत. तो टेपरेकॉर्डर खूप जुना झाला होता. म्हणून जेव्हा रवीनाला तिची पहिली कमाई म्हणून ५०० रुपये मिळाले तेव्हा तिने त्या पैशातून तिच्या आईला एक नवीन टेपरेकॉर्डर भेट दिला होता.

हेही वाचा- “कोहिनूर हिरा, विजय मल्ल्या अन् ललित मोदी…” अभिनेत्री ट्विंकल खन्नाची ब्रिटनच्या सरकारकडे भलतीच मागणी

शोच्या परीक्षक अर्चना पूरण सिंह यांनी कपिलला त्याच्या पहिल्या पगाराबद्दल विचारले. यावर कपिल म्हणाला की, विश्वास बसणार नाही, पण त्याचा पहिला पगार फक्त ५०० रुपये होता आणि त्याने त्याच्याकडून एक कॅसेट प्लेअरही विकत घेतला होता. कपिल म्हणाला की, तो जुनी गाणीही ऐकायचा मात्र, कॅसेट प्लेअर विकत घेण्यासाठी त्याने त्याच्या वडिलांकडे पैसे मागितले नाहीत. त्याने पहिल्या कमाईतून एक कॅसेट प्लेअर घेतला होता, तसेच त्या पैशातून आईसाठीही काहीही खरेदी केले असल्याचे कपिल म्हणाला.