अभिनेत्री रवीना टंडन ही गेली अनेक वर्षे मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे. गेली अनेक वर्ष विविध चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही तिचा फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. पण काही वेळा तिला या फॅन फॉलोईंगचा त्रास झाल्याचा खुलासा तिने केला आहे. रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या चाहत्यांच्या क्रेझबद्दल सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी रविनाला एका चाहत्याचा फार वाईट अनुभव आल्याचे तिने सांगितले. रवीनाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एकाच चाहत्याने सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे रवीना म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवीना नुकतीच ‘ई टाईम्स’ला एक मुलाखत दिली. रवीना टंडनने या मुलाखतीत खुलासा केला की तिचा एक चाहता तिला पत्नी मानत होता आणि इतकेच नव्हे तर रवीनाच्या मुलांनाही तो स्वतःची मुले म्हणत होता.

आणखी वाचा : अफेअर, लिव्ह इन, १५ वर्षांचा संसार…’असं’ होतं किरण रावचं आमिर खानबरोबर नातं

रवीना म्हणाली, “माझा गोव्यातील एक चाहता होता मला स्वतःची पत्नी समजायचा. मी त्याच्याशी लग्न केले आहे आणि माझी मुले त्याची मुले आहेत असाच त्याचा समज झाला होता. तो मला त्याच्या रक्ताने माखलेल्या काचांचे तुकडे कुरियर करत असे. तसेच स्वतःच्या रक्ताने लिहिलेली पत्रे आणि अश्लील फोटोही तो पाठवत असे.”

पुढे रवीनाने सांगितले, “एकदा माझ्या पतीच्या गाडीवर कोणीतरी मोठा दगड फेकला, त्यानंतर पोलिसांना फोन करावा लागला. तर असाच आणखी एक चाहता होता आमच्या घराच्या गेटवर बसायचा. मी अशा लोकांमुळे हैराण झाले होते. एकवेळ अशी आली की मला वेडेपणाची या वेडेपणाची भीतीही वाटू लागली.”

हेही वाचा : “…म्हणून प्रत्येक गाडीची नंबर प्लेट सारखीच,” रवीना टंडनने अनेक वर्षांनी केले गुपित उघड

दरम्यान रवीना शेवटची ब्लॉकबस्टर ‘केजीएफ २’मध्ये दिसली होती. तिची ही भूमिका आणि तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटातील तिच्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली. तर आता रवीना ओटीटीवर तिची छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या एका वेब सिरीजच्या कामात ती व्यस्त आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon shared bad experience of her fans rnv