नुकताच भारत सरकारकडून अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेव्हापासून रवीना चांगलीच चर्चेत आहे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान रवीनाला देण्यात आला. या सोहळ्याला रवीनाने मुलगी राशा आणि मुलगा रणबीर थडानी यांच्यासह हजेरी लावली होती. पद्मश्री मिळाल्यामुळे रवीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता रवीनाने तिच्यावर होणाऱ्या टीकेबाबत मौन सोडले आहे.
बुधवार, ५ एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला चित्रपटक्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार मिळाला. यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. तिला हा विशेष पुरस्कार का मिळाला यावर नेटिझन्सनी प्रश्न विचारला. शिवाय तिने असं काय वेगळं कार्य केलं आहे ज्यामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे असा सवालही नेटकऱ्यांनी केला. रवीना टंडनने आता या प्रकरणावर नुकतंच भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : दागिने, हारतुरे, लिंबाची माळ; अल्लू अर्जुनच्या लूकचं ‘या’ धार्मिक परंपरेशी असू शकतं कनेक्शन
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना सांगितले की, “‘मी त्यांना काडीचंही महत्त्व देऊ इच्छित नाही कारण त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे. काही लोकांच्या टीका करण्याने माझ्या कामाचं महत्त्व कमी होत नसतं. ट्रोलर्सना फक्त ग्लॅमर दिसतं, त्यांना आमची मेहनत आणि त्यासाठी दिलेला आमचा अमूल्य वेळ दिसत नाही.” अशा शब्दात उत्तर देत रवीनाने ट्रोलर्सना निरुत्तर केलं आहे.
रवीनासह ‘आरआरआर’ चित्रपटाचे संगीतकार एमएम किरवानी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रवीनाने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटाबरोबरच रवीनाने ओटीटी या माध्यमातूनही अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘अरण्यक’ या वेबसीरिजमधील रवीनाच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.