अक्षय कुमार व रवीना टंडन हे दोघे ब्रेकअपच्या जवळपास दोन दशकानंतर रविवारी एका कार्यक्रमात पहिल्यांदाच एकत्र दिसले. तेव्हापासून दोघांच्या अफेअरचे जुने किस्से ते ब्रेकअपची कारणं, या विषयांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. अक्षय व रवीना यांनी ‘मोहरा’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं, तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती असं म्हटलं जातं. पण या चित्रपटासाठी रवीना पहिली पसंती नव्हती.
मंचावर येत मिठी मारली अन्…, ब्रेकअपनंतर २२ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र दिसले अक्षय कुमार-रवीना टंडन
‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांना या सिनेमात रवीना टंडनला कास्ट करायचे नव्हते. त्या काळातील टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दिव्या भारतीला त्यांनी या चित्रपटासाठी साईन केलं होतं. दिव्या भारतीने चित्रपटाचा काही भाग शूट केला होता, परंतु तिच्या अचानक निधनाने परिस्थिती बदलली. दिव्या भारती जिवंत असती तर रवीनाच्या जागी ती ‘मोहरा’मध्ये ‘रोमा’च्या भूमिकेत दिसली असती. ‘एबीपी न्यूज’ने याबद्दल वृत्त दिलंय.
दिव्या भारतीच्या निधनानंतर ‘मोहरा’ चित्रपटाचे शूटिंग थांबले. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी रवीना टंडनला ‘रोमा’च्या भूमिकेसाठी साईन केलं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रवीना टंडनला खूप लोकप्रियता मिळाली आणि या चित्रपटानंतर तिच्या आयुष्यात अक्षय कुमारची एंट्री झाली. दिव्या भारतीच्या अचानक निधनाने रवीनाला तो चित्रपट मिळाला, नाहीतर कदाचित तिची व अक्षय कुमारची जोडी बनली नसती.